चाकूचा धाक दाखवून पैसे लुटणाऱ्या चोराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 12:00 PM2020-03-17T12:00:58+5:302020-03-17T12:02:23+5:30

एका स्टोरमधील चोरीच्या प्रयत्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात स्टोर मालकाने चोराच्या डोळ्यात थेट मिरची पावडर फेकल्याचे दिसत आहे.

Shopkeeper put chilli powder on theft man UK video viral on social media api | चाकूचा धाक दाखवून पैसे लुटणाऱ्या चोराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, व्हिडीओ व्हायरल!

चाकूचा धाक दाखवून पैसे लुटणाऱ्या चोराच्या डोळ्यात टाकली मिरची पावडर, व्हिडीओ व्हायरल!

Next

सोशल मीडियात आपण नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी दरोड्यांचे व्हिडीओ बघत असतो. त्यात कशाप्रकारे काही लोक हिंमतीने चोरांना पळवून लावतात हेही आपण पाहिलं आहे. असाच एका स्टोरमधील चोरीच्या प्रयत्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात स्टोर मालकाने चोराच्या डोळ्यात थेट मिरची पावडर फेकल्याचे दिसत आहे.

यूकेमध्ये एका स्टोरमध्ये चोर घुसला तेव्हा त्याला अद्दल घडवण्यासाठी स्टोर मालकाने भन्नाट आयडिया केली. हा चोर दुकानदाराला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत होता. अशातच स्टोर मालकाने चोराच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याला धडा शिकवला आणि चोर लगेच तिथून पळाला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

स्टोर मालकाने कशाप्रकारे न घाबरता चोराला पळवून लावले हे तुम्ही यात बघू शकता. नंतर सीसीटीव्ही व्हिडीओच्या आधारे दुकानदारानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या चोराचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुकानदारानं बॉलिवूड स्टाईलनं चोराला पळवून लावलं आहे.


Web Title: Shopkeeper put chilli powder on theft man UK video viral on social media api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.