वाह रे पठ्ठया! सैनिकाने टॅंकच्या मदतीने केलं तरूणीला प्रपोज, व्हिडीओ झाला व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:20 IST2020-02-17T11:19:46+5:302020-02-17T11:20:27+5:30

व्हॅलेंटाइन डे ला रशियातील एका सैनिकाने प्रेयसीला असं काही प्रपोज केलं की, जगाला हे नेहमीसाठी लक्षात राहील.

Russian soldier valentines day proposal goes viral | वाह रे पठ्ठया! सैनिकाने टॅंकच्या मदतीने केलं तरूणीला प्रपोज, व्हिडीओ झाला व्हायरल...

वाह रे पठ्ठया! सैनिकाने टॅंकच्या मदतीने केलं तरूणीला प्रपोज, व्हिडीओ झाला व्हायरल...

व्हॅलेंटाइन डे ला रशियातील एका सैनिकाने प्रेयसीला असं काही प्रपोज केलं की, जगाला हे नेहमीसाठी लक्षात राहील. या सैनिकाने १६ हेवी टॅंकने हार्ट तयार केलं आणि मधोमध तिला नेऊन उभं केलं. नंतर त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं. या अनोख्या प्रपोजचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

Alabino ट्रेनिंग ग्राउंडमध्ये सैनिकाने प्रेयसीला प्रपोज केलं. हे सगळेच टॅंक T-72B3 आहेत. या टॅंकच्या मदतीने त्याने हार्ट शेप तयार केला आणि नंतर प्रेयसीला सरप्राइज दिलं. 

या रशियन सैनिकाचं नाव  Denis Kazantsev असून त्याच्या प्रेयसीचं नाव Alexandra Kopytova आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघेही एकत्र आहेत. इतकेच नाही तर त्यांचा हा व्हिडीओ तेथील संरक्षण मंत्रालयाने देखील पोस्ट केला आहे. त्याच्या प्रेयसीने सांगितले की, हा क्षण फारच भावूक करणारा होता. सोशल मीडियातूनही या अनोख्या प्रपोजचं कौतुक केलं जात आहे.

जगभरात लोक आपल्या प्रेयसीला वेगवेगळ्या प्रकारे प्रपोज करतात आणि त्यांची सोशल मीडियात भरभरून चर्चाही होत असते. पण हा सैनिकाने केलेला प्रपोज त्याहून वेगळा आणि अधिक अनोखा असल्याचं लोक बोलत आहेत.


Web Title: Russian soldier valentines day proposal goes viral