Optical Illusion : रोज सोशल मिडियावर कितीतरी फोटो व्हायरल होत असतात. जे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणतात, तर काही फोटो आपल्या मेंदूला आणि डोळ्यांना आराम देणारे ठरतात. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हणतात. म्हणजेच हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. कारण त्या फोटोंमध्ये जे आहे ते आपल्याला सहजपणे दिसत नाही. ते आपल्याला बारकाईने फोटो बघून शोधावं लागतं. यात एक वेगळीच मजा येते. असाच एक फोटो आम्ही घेऊन आलोय, ज्यात किती पक्षी आहेत हे आपल्याला शोधायचं आहे.
आपल्याला समोर दिसत असलेल्या फोटोत पिवळ्या रंगाचे काही पक्षी एका रांगेत बसलेले दिसत आहेत. पहिल्यांदा पाहिल्यावर हे सुंदर पक्षी आपलं लक्ष वेधून घेतात. मुख्य मुद्दा आहे की, आपल्याला यात किती पक्षी आहेत हे शोधायचं आहे. म्हणजे पक्ष्यांची संख्या सांगायची आहे. तसे तर समोर सहा पक्षी दिसतात. पण यात सहापेक्षा जास्त पक्षी आहेत. ते किती हेच चॅलेंज आहे. हे चॅलेंज पू्र्ण करण्यासाठी आपल्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असल्याने पहिल्यांदा जेव्हा आपण फोटो बघतो, तेव्हा त्यात नेमकं काय किंवा किती पक्षी-प्राणी आहेत हे कळून येत नाही. जेव्हा आपण बारकाईने फोटो बघाल तेव्हा त्याचं खरं चित्र समोर येतं. महत्वाची बाब म्हणजे ही शोधाशोध करत असताना आपले डोळे आणि मेंदूचा चांगला व्यायामही होतो. त्यामुळे असे फोटो मानसिक आरोग्यासाठीही चांगले असतात. या फोटोंनी फोकस करण्याची क्षमता वाढते.
जर आपल्याला फोटोत किती पक्षी आहेत दिसलं असेल तर आपलं अभिनंदन. पण अनेकदा शोधूनही पूर्ण पक्षी दिसले नसतील तर काही हरकत नाही. आपण पुन्हा एकदा फोटोतील पक्षी किती शोधू शकता. जर तरी सापडले नाही तर निराश होऊ नका. कारण यात किती पक्षी आहेत हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
या फोटोत तसे तर पहिल्यांदा ६ पक्षी दिसतात. पण यात ६ पेक्षा जास्त पक्षी आहेत. यात ३ छोटे पक्षी, तर ९ मोठे पक्षी आहेत. म्हणजे एकूण १२ पक्षी या फोटोत आहेत. पुन्हा एकदा बारकाईने फोटो बघाल तर नक्कीच १२ पक्षी दिसतील.
Web Summary : A viral optical illusion challenges viewers to find the total number of birds hidden in a picture within 10 seconds. While six birds are initially visible, keen observation reveals a total of twelve, testing focus and visual perception.
Web Summary : व्हायरल ऑप्टिकल इल्युजनमध्ये 10 सेकंदात चित्रात लपलेले एकूण पक्षी शोधण्याचे आव्हान आहे. सुरुवातीला सहा पक्षी दिसतात, पण बारकाईने पाहिल्यास एकूण बारा पक्षी दिसतात, जे एकाग्रता आणि दृश्य आकलनाची परीक्षा घेतात.