Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 11:20 AM2023-12-20T11:20:18+5:302023-12-20T11:23:03+5:30
Optical Illusion : यातून तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमची डोळ्यांची टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
![Optical Illusion : Find the mouse hiding in the picture after being scared of the cat | Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर Optical Illusion : Find the mouse hiding in the picture after being scared of the cat | Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/6998cfbd-2b9f-453d-82ae-c10a1db4a7a7_2023121142949.jpg)
Optical Illusion: आपल्या तीक्ष्ण डोळ्यांनी 8 सेकंदात शोधा मांजरीला घाबरून लपलेला उंदीर
Optical Illusion : सोशल मीडियावर व्हायरल होणारे ब्रेन टीजर किंवा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सगळ्यांनाच आवडतात. कारण हे फोटो तुमच्यासमोर भ्रम निर्माण करतात. ज्यात कधी तुम्हाला लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. पण हे काम इतकंही सोपं नसतं. यातून तुमचं मनोरंजनही होतं आणि तुमची डोळ्यांची टेस्टही होते. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये एक उंदीर मांजरी घाबरून लपलेला आहे. त्यालाच तुम्हाला शोधायचं आहे. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत काही लाकडं आणि एक मांजर दिसत आहे. जी एका उंदराला शोधत आहे. उंदीर तिथेच आजूबाजूला लपलेला आहे. ज्याला शोधण्यासाठी तुमच्याकडे केवळ 8 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, या फोटोत मांजरीपासून लपलेल्या उंदराला तुम्ही 8 सेकंदात शोधलं असेल. जर तुम्हाला दिलेल्या वेळेत तो दिसला असेल तर तुम्ही जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही खूप तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील उंदीर सापडला नसेल तर निराश होऊ नका. एखाद्या दुसऱ्या चॅलेंजमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल. या फोटोतील उंदीर कुठे लपलाय हे तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.