VIDEO : भावासमोरच वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला दीर, व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 07:28 PM2021-07-26T19:28:24+5:302021-07-26T19:31:46+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लग्नानंतर सासरी आलेली नवरी पतीसोबत एका सोफ्यावर बसलेली आहे.

Naughty devar sitting on bhabhis lap in front of his brother 75 lakh views video | VIDEO : भावासमोरच वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला दीर, व्हिडीओ व्हायरल...

VIDEO : भावासमोरच वहिनीच्या मांडीवर जाऊन बसला दीर, व्हिडीओ व्हायरल...

Next

लग्नानंतर नवरी जेव्हा सासरी जाते तेव्हा घरात एकुलती एक अशी व्यक्ती असते जी नवरीसोबत सर्वात जास्त मस्ती करते. ती व्यक्ती म्हणजे दीर. वहिनी आणि दिराचं नातं सर्वांनाच माहीत आहे. दोघांमध्ये मजा-मस्ती सुरू असते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात दीर त्याच्या नव्या वहिनीसोबत मस्ती करताना दिसत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, लग्नानंतर सासरी आलेली नवरी पतीसोबत एका सोफ्यावर बसलेली आहे. अशात त्यांच्या आजूबाजूला परिवारातील सर्व सदस्य उभे आहेत. तर दीर आपल्या वहिनीसोबत गंमत करण्याच्या मूडमध्ये आहे. दीर सर्वांसमोर वहिनीच्या मांडीवर जाऊन बसतो. (हे पण बघा : VIDEO : सासरी फुलांनी सजलेला बेड पाहून नवरी झाली हैराण, विचारला अजब प्रश्न....)

इतकंच नाही तर जसाही दीर आपल्या वहिनीच्या मांडीवर बसतो तेव्हा आजूबाजूला असलेला नातेवाईक हसू लागतात. वहिनीही हसत हसत दिराला मांडीवरून उठण्यास सांगते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतो आहे. इन्स्टाग्रामवर राजीव ब्रार या यूजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला ५ लाख ५२ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Naughty devar sitting on bhabhis lap in front of his brother 75 lakh views video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app