Indian couple romance on Maine Pyar Kiya song Dil Deewana video viral | 'या' कपल्सच्या डान्सने लोकांना लावलंय वेड, तुम्ही बघितला नसेल तर लगेच बघा....
'या' कपल्सच्या डान्सने लोकांना लावलंय वेड, तुम्ही बघितला नसेल तर लगेच बघा....

१९८९ मध्ये रिलीज झालेला 'मैने प्यार किया' हा सिनेमा आजही अनेकांच्या स्मरणात असेल. या सिनेमातील गाणीही आजही तेवढ्याच आवडीने ऐकली जातात. सलमान खान आणि भाग्यश्री यांच्यातील कमाल केमिस्ट्री आठवून अनेकांना आजही गुदगुल्या होत असेल. त्यांचं 'दिल दिवाना बिन सजाना के' हे गाणं अनेकांसाठी खास आहे. याच गाण्यावर एका कपलने केलेला डान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

हा व्हिडीओ ट्विटरवर @bhaiyyajispeaks नावाच्या यूजरने शेअर केलाय. याला त्याने कॅप्शन दिलंय, 'भारत आणि बॉलिवूड'. म्हणजे त्याला हे सांगायचंय की, यात खरा भारत आणि बॉलिवूड आहे. या कपलने ना भारीतले कपडे घातलेले आहेत ना त्यांनी मेकअप केलंय. त्यांचा साधेपणाच लोकांची मनं जिंकत आहे.

आतापर्यंत या व्हिडीओ २ लाख ७० हजार व्ह्यू, ११,५५० लाइक्स आणि २ हजार पेक्षा अधिक लोकांनी रिट्विट केलाय. 


Web Title: Indian couple romance on Maine Pyar Kiya song Dil Deewana video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.