MSU Girl Dance controversy: साडी नेसलेली एक तरुणी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध धक-धक गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये तरुणी डान्स करत असताना पाठीमागे बॅनर दिसत आहे आणि त्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाव दिसत आहे. त्यावरूनच हा सगळा वाद सुरू झाला. पण, त्यात भरडली गेली, ती तरुणी. तिला इतकं ट्रोल केलं गेलं की, ढसाढसा रडत तिने चुकीचं गाणं निवडल्याबद्दल माफी मागितली.
महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील कार्यक्रमात डान्स करतानाचा हा व्हिडीओ समोर आला. तो काँग्रेसशी संबंधित संघटनांनी शेअर करताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला लक्ष्य केले गेले. पण, त्यानंतर तरुणीलाही ट्रोल करण्यास सुरुवात झाली.
भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले की, संस्कारी शहरात हा कोणत्या पद्धतीचा कार्यक्रम होत आहे. तरुणीचा डान्स करतानाचा व्हिडीओही शेअर करण्यात आला.
तरुणीला अश्रू अनावर, रडतच म्हणाली...
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीला ट्रोल केलं जाऊ लागलं. त्यानंतर तिने एक व्हिडीओ शेअर केला, ज्यात ती रडतच बोलत आहे. मला वाटलं नव्हतं की, यावरून इतकं वादंग होईल, असे म्हणत तरुणी ढसाढसा रडली.
तरुणी म्हणाली की, "मी साडी नेसलेली होती. त्यात कुठेही अश्लीलता नव्हती. हा मी गाणे चुकीचे निवडले होते. त्याबद्दल मी माफी मागते. पण, ज्या पद्धतीने सोशल मिडिया कमेंट्स केल्या जात आहेत, त्यामुळे प्रचंड वेदना होत आहे."
तरुणीनेही हेही स्पष्ट केले की, ती एबीव्हीपी किंवा एनएसयूआय यापैकी कोणत्याही संघटनेसोबत काम करत नाही. सोमवारी सकाळपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटल्या.
Web Summary : MSU student's dance video at ABVP event went viral, sparking outrage. Accused of vulgarity, the girl tearfully apologized, citing the song choice and online abuse.
Web Summary : ABVP कार्यक्रम में MSU छात्रा का नृत्य वीडियो वायरल, आक्रोश। अश्लीलता का आरोप, लड़की ने गीत पसंद और ऑनलाइन दुर्व्यवहार का हवाला देते हुए आंसू बहाकर माफी मांगी।