Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 02:17 PM2023-03-29T14:17:30+5:302023-03-29T14:18:34+5:30

Husband Wife Viral Video: सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या 'The Boys' मीमवर आधारित व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Husband Smoking On Bike Video wife gave him Cigarette; Watch the viral video | Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video

Video: चालू गाडीवर बायकोने पुरवले नवऱ्याचे लाड; हातात सिगारेट अन्...; पाहा Video

googlenewsNext

Husband Smoking On Bike Video: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'The Boys' मीम ट्रेंडिंगवर आहे. पुरुष आपले आयुष्य मौज मस्तीत जगतात, आपल्या अटींवर जगतात, अशा प्रकारच्या व्हिडिओंवर हे 'The Boys' मीम लावले जाते. अशातच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण आपल्या बायको आणि चिमुकल्यासोबत गाडीवरुन जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

तरुण गाडी चालवत आहे, त्याची बायको मागे बसलीये आणि चिमुकला पुढे बसलाय. यावेळी पाठीमागून कारमध्ये येणाऱ्या व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट केला. या व्हिडिओमध्ये त्या तरुणाची बायको हातात सिगारेट घेऊन बसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, ही सिगारेट ती स्वतः ओढत नाही, तर समोर गाडी चालवणाऱ्या पतीला ओढायला देते. 

या व्हायरल व्हिडिओमध्ये पतीने हेल्मेट घातलेले दिसत नाही. तसेच, सिगारेट ओढण्यासाठी तो पाठीमागे बघतो. यावेळी गाडीवर त्यांचा चिमुकला मुलगा बसलेला असताना हा सर्व प्रकार सुरू आहे. गाडी चालवणाऱ्या तरुणाला सिगारेटची झालेली तलफ त्याची पत्नी पुर्ण करते. हा धक्कादायक प्रकार पाहून नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलेच फैलावर घेतले आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रियादेखील येत आहेत. जीव इतका स्वस्त आहे का रे बाबा म्हणत त्या तरुणाला खडेबोल सुणावले आहेत. तसेच त्या चिमुकल्यासमोर असे प्रकार करुन स्वतःसह संपूर्ण कुटूंबाचा जीव धोक्यात न घालण्याचा सल्लाही अनेकांनी दिला आहे. तर काही नेटकऱ्यांनी त्यांना अटक करण्याचीही मागणी केली आहे. 
 

Web Title: Husband Smoking On Bike Video wife gave him Cigarette; Watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.