शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 09:17 PM2024-06-11T21:17:37+5:302024-06-11T21:18:41+5:30

Sharad Pawar : खासदार शरद पवार आज बारामती मध्ये आहेत, विविध कार्यक्रमांसाठी ते आले आहेत. यावेळी पवार यांनी जैन मुनींची भेट घेतली.

What do you think about vegetarian? Sharad Pawar's answer to Jain Muni's question in one sentence | शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

शाकाहरीबाबत तुमचं मत काय? जैन मुनींच्या प्रश्नावर शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

Sharad Pawar ( Marathi News ) : खासदार शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मध्य प्रदेशहून बारामतीमधील विहारमध्ये आलेल्या जैन मुनींची भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यात आणि पवार यांच्यात चर्चा झाली. यावेळी शरद पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी जैन मुनी यांच्यासोबत शाकाहरी बाबत चर्चा केली. 

बारामती येथील महावीर भवन येथे व्यापाऱ्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी शरद पवार उपस्थित होते. याआधी पवार यांनी महावीर भवनमध्ये आलेल्या विशालसागरजी महाराज, धवलसागरजी व उत्कृष्ट सागर महाराज यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शरद पवार यांनी विविध विषयांवर चर्चा केली. 

महायुती सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रेसची राज्यपालांकडे मागणी

यावेळी जैन मुनी यांनी शरद पवार यांना शाकाहरी बाबत चर्चा केली, मुनी म्हणाले, तुमचे शाकाहरी बाबतीत मत काय आहे? यावर बोलताना पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहरी आहे, याअगोदर मी शाकाहरी नव्हतो. पण मागच्या एक वर्षापासून मी पूर्ण शाकाहरी आहे, असं उत्तर शरद पवार यांनी दिले. 

शरद पवार जनता दरबारात

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान, शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्या समर्थकही शरद पवारांची भेट घेतली. यावेळी युगेंद्र पवार यांच्या समर्थकांनी थेट शरद पवारांपुढे बारामतीचा दादा बदलाचाय, तुम्ही युगेंद्र पवारांना ताकद द्या, अशी मागणी केली. युगेंद्र पवारांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी समर्थकांनी यावेळी केली. त्यावर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

"आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे," अशी मागणी युगेंद्र समर्थकांनी शरद पवारांकडे केली.

Web Title: What do you think about vegetarian? Sharad Pawar's answer to Jain Muni's question in one sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.