Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 07:36 PM2024-06-11T19:36:22+5:302024-06-11T19:37:13+5:30

हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Vande Bharat Train Video : Hundreds of ticketless passengers enter Vande Bharat; VIDEO went viral | Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...

Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...

Vande Bharat Train Video : गेल्या काही काळापासून देशभरात वंदे भारत ट्रेनची संख्या वाढत आहे. ही देशातील सर्वात आधुनिक ट्रेन असून, यात प्रवाशांना अनेक सुविधा मिळतात. विशेष म्हणजे, या ट्रेनमध्ये तुम्हाला थोडीदेखील गर्दी पाहायला मिळत नाही. जेवढे सीट, तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतात. पण, सध्या वंदे भारत ट्रेनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात अनेक विना तिकीट प्रवासी वंदे भारतमध्ये शिरल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @IndianTechGuide नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ अवघ्या 5 सेकंदाचा असला तरी सोशल मीडियावर या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडिओमध्ये वंदे भारत ट्रेनच्या डब्यात विना तिकीट प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. दावा केला जातोय की, जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला, तेव्हा ट्रेन लखनऊमध्ये उभी होती. म्हणजेच ही सर्व गर्दी लखनऊ स्टेशनवरुन चढलेली असू शकते.

हा व्हिडिओ आतापर्यंत 1.3 मिलियन म्हणजेच 13 लाख वेळा पाहिला गेला आहे, तर 17 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर काही प्रवासी संतापले असून, त्यांनी अशा प्रवाशांना दंड ठोठावण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेकडूनही उत्तर आले. पोस्टला उत्तर देताना रेल्वेने म्हटले, 'संबंधित अधिकाऱ्यांना कळविण्यात येत आहे. आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करू.' 

Web Title: Vande Bharat Train Video : Hundreds of ticketless passengers enter Vande Bharat; VIDEO went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.