VIDEO: चेंडूसाठी काहीपण! 'तो' मगरीच्या शेपटीजवळ गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:55 IST2020-12-18T04:21:15+5:302020-12-18T06:55:41+5:30

मगरीने केलेली हालचाल पाहून दोन्ही भावांनी तेथून धूम ठोकली

Florida Man Picks Up Golf Ball From Alligators Tail | VIDEO: चेंडूसाठी काहीपण! 'तो' मगरीच्या शेपटीजवळ गेला अन्...

VIDEO: चेंडूसाठी काहीपण! 'तो' मगरीच्या शेपटीजवळ गेला अन्...

गल्ली क्रिकेट खेळताना चेंडू छतावर जाऊ दे किंवा नाल्यामध्ये... खेळाडू काहीही करून चेंडू मिळवतातच. मात्र जर का चेंडू मगरीच्या शेपटीवर पडला तर? नक्कीच, कुणीही तो चेंडू आणण्यास जाणार नाही. मात्र अमेरिकेतील दोन गोल्फपटूंनी चेंडू मिळविण्यासाठी हा वेडेपणा केला. सध्या त्यांच्या याच वेडेपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. काईल डाऊन्स नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.



माहितीनुसार, काईल आणि त्याचा भाऊ फ्लोरिडा येथील कोरल ओक्स गोल्फ कोर्सवर खेळत असताना चेंडू तलावाच्या किनाऱ्यावर बसलेल्या मगरीच्या शेपटीवर अडकला. यानंतरही दोघांनी चेंडू आणण्याचे ठरवले. एकाने सावधपणे मगरीच्या शेपटीवरून चेंडू उचललाही आणि त्यानंतर मगर वेगाने तलावात निघून गेली. मगरीने केलेली हालचाल पाहून दोन्ही भावांनीही तिथून धूम ठोकली. 

Web Title: Florida Man Picks Up Golf Ball From Alligators Tail