अजब लग्नाची गजब गोष्ट ! नवरीचा हा साजशृंगार, नवराही भारी दिसतोय पगडीत, पाहा हे नवं जोडपं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 16:39 IST2021-07-20T16:38:21+5:302021-07-20T16:39:01+5:30

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक नवरानवरीचे लग्नाचे सुंदर तसेच मजेशीर व्हिडिओही समोर येत आहेत. मात्र या सर्व व्हिडिओंमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका खास व्हिडिओची. हा व्हिडिओ आहे दोन अशा जीवांच्या मिलनाचा जे घराचे राखणदार म्हणून ओळखले जातात.

Dogs getting married, Dressed up in desi avtar, New dog bride and groom looking beautiful | अजब लग्नाची गजब गोष्ट ! नवरीचा हा साजशृंगार, नवराही भारी दिसतोय पगडीत, पाहा हे नवं जोडपं

अजब लग्नाची गजब गोष्ट ! नवरीचा हा साजशृंगार, नवराही भारी दिसतोय पगडीत, पाहा हे नवं जोडपं

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे. अनेक नवरानवरीचे लग्नाचे सुंदर तसेच मजेशीर व्हिडिओही समोर येत आहेत. मात्र या सर्व व्हिडिओंमध्ये जोरदार चर्चा आहे ती एका खास व्हिडिओची. हा व्हिडिओ आहे दोन अशा जीवांच्या मिलनाचा जे घराचे राखणदार म्हणून ओळखले जातात.

तुम्ही पाहु शकता ती साजशृंगार केलेली नवरी. पण ही नवरी एक कुत्री आहे. तर खास पगडी घालुन ऐटीत तिच्या बाजूला तिचा नवरा कुत्रा उभा आहे. या दोघांनी वचन घेतली आहेत एकमेकांना आयुष्यभर साथ संगत करण्याची. २४ बर्ड्स अॅनिमल या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला ४६ हजार पेक्षा जास्त व्हिव्ज आणि हजारो लाईक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत.
तुम्ही या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहु शकता की नवरी कुत्रीने बिंदी, कानात झुमका, डोक्यावर पदर असा खास नवरीचा साज केला आहे. तर कुत्र्याने नक्षीदार पगडी घातली आहे. दोघांच्या गळ्यात फुलाच्या माळा आहेत. आता या दोघांचा संसार कसा होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या व्हिडिओवर कोणतीही कॅप्शन नाही. नाही या व्हिडिओला कॅप्शनची गरज आहे. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाला.

Web Title: Dogs getting married, Dressed up in desi avtar, New dog bride and groom looking beautiful