'हा' व्हिडीओ संपूर्ण पाहण्यासाठी संयम असणं गरजेचं; मग पाहणार का व्हिडीओ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 05:24 PM2019-07-26T17:24:16+5:302019-07-26T17:25:35+5:30

ट्विटरवर एका व्यक्तीने असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहण्यासाठी फार संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये आहे का संयम?

This colouring video test your patience can you watch it till the end | 'हा' व्हिडीओ संपूर्ण पाहण्यासाठी संयम असणं गरजेचं; मग पाहणार का व्हिडीओ?

'हा' व्हिडीओ संपूर्ण पाहण्यासाठी संयम असणं गरजेचं; मग पाहणार का व्हिडीओ?

Next

सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असेच अनेक व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. आता हे व्हायरल होणारे व्हिडीओ संपूर्ण पाहायचे की नाही, याचा निर्णय आपण व्हिडीओ काही सेकंद पाहिल्यानंतरच करतो. परंतु, ट्विटरवर एका व्यक्तीने असा व्हिडीओ शेअर केला आहे, जो पाहण्यासाठी फार संयम ठेवण्याची गरज आहे. तुमच्यामध्ये आहे का संयम? कारण ट्विटरवर व्हिडीओ पाहतानाच अनेक यूजर्सचा संयम सुटला. एकदा तुम्हीही प्रयत्न करून पाहा, कदाचित तुमच्याकडे खूप संयम असू शकतो. 

तपासून पाहा तुमचा संयम...

ट्विटर यूजर @polina_bright ने हा व्हिडीओ 25 जुलै रोजी शेअर केला आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे की, 'खूप संयम असणं गरजेचं आहे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी?' आतापर्यंत हा व्हिडीओ जवळपास 2 कोटी लोकांनी पाहिला आहे. तसेच 31 हजार लोकांनी रिट्विट आणि 80 हजार लोकांनी लाईक केला आहे. 

नेटकऱ्यांचा सुटला संयम...

काय आहे नक्की या व्हिडीओमध्ये? 

या व्हिडीओमध्ये इंग्रजीमध्ये  'माय पेशन्स' असं लिहिलं आहे. सर्व शब्द कॅपिटल लेटर्समध्ये एका खालोखाल लिहिले आहेत. एक व्यक्ती स्केच पेनच्या मदतीने वरून खाल्या दिशेला बॉक्समध्ये रंग भरत येते. सगळ्यात शेवटी संपूर्ण बॉक्स वेगवेगळ्या रंगांनी रंगून जातो. फक्त शेवटी ती व्यक्ती बॉक्स पूर्ण रंगवण्याऐवजी स्केचपेन बाहेर घेऊन जातो आणि व्हिडीओ संपतो. हा व्हिडीओ एकूण 42 सेकंदांचा आहे. तरिसुद्धा अनेक लोक हा व्हिडीओ संपर्ण पाहू शकत नाहीत. 

खरं तर अनेक नेटकऱ्यां  शेवटी बॉक्स पूर्ण न रंगवता बाहेर जाणाऱ्या रंगामुळे संयम सुटल्याचे दिसत आहे. 

Web Title: This colouring video test your patience can you watch it till the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.