Can you find the cat in this viral photo | 'या' फोटोत लपून बसलीये एक मांजर, शोधाल तर जागेवरच मारू लागाल उड्या!
'या' फोटोत लपून बसलीये एक मांजर, शोधाल तर जागेवरच मारू लागाल उड्या!

जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे डोळे फारच चांगले आहेत आणि तुम्ही गोष्टी शोधण्यात उस्ताद आहात. तर एकदा हा फोटो तुम्ही बघायलाच हवा. हा फोटो पाहिल्या पाहिल्या जर तुम्ही यात लपलेल्या मांजरीला शोधू शकलात तर तुमचे डोळे खरंच चांगले आहेत. 

When you see it! from r/pics

काहीच दिसलं नसेल तर खाली स्क्रोल करून तुम्ही मांजर कुठे आहे हे वाचू शकता. पण हार मानायची नसेल तर शोध सुरूच ठेवा. हा फोटो एका यूजरने रेडीटवर शेअर केला होता. फोटो जुनाच आहे पण पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. आणि लोक कामीही लागले आहेत.

हे त्या लोकांसाठी आहे ज्यांनी फार मेहनत घेतली पण तरी सुद्धा यातील मांजर शोधू शकले नाही. जर तुम्ही शोधली असेल तर आनंदी होण्याचा आणि आनंदी होऊ जागेवर उड्या मारण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. काहीच दिसलं नसेल तर  हा फोटो झूम करून बघा. वरच्या भागात लाकडांसारखाच रंग असलेली एक मांजर झोपलेली आहे.


Web Title: Can you find the cat in this viral photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.