आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 18:10 IST2026-02-01T18:09:49+5:302026-02-01T18:10:42+5:30

अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. 

America Woman gave birth to baby in office, didn't understand anything for 9 months | आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय?

आश्चर्यच...; महिलेनं ऑफिसातच दिला बाळाला जन्म, ९ महिने काहीच समजलं नाही! नेमकं प्रकरण काय?

या जीवसृष्टीत जेव्हा एखाद्या जीवाला गर्भधारणा होते, तेव्हा त्यात बरेच छोटे-मोठे शारीरीक बदल होत असतात. जीवांच्या जातीप्रमाणे गर्भधारणेचा ठरावीक काळही असतो. मानवाच्या बाबतीत हा काळ साधारणपणे ९ महिन्यांचा असतो. या गर्भधारणा काळ महिलांमध्ये काही अपरिहार्य बदल होत असतात. मात्र, अमेरिकेतील आयोवा येथून एक आश्चर्य चकित करणारी घटना समोर आली आहे. येथील 'फेडएक्स' नावाच्या कंपनीत कार्यरत असलेल्या एका महिलेने, कंपनीतच एका गोंडस मुलाला जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपण गर्भवती आहोत याची साधी कल्पनाही तिला नव्हती. 

नेमकं प्रकरण काय? -
केसीसीआय आणि केईएनएस या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एमीथिस्ट ब्लूमबर्ग असे या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. संबंधित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपली शिफ्ट संपवत असताना बाथरूमला गेली. यावेळी, तिला अचानकच असह्य वेदना  होऊ लागल्या. यानंतर काही क्षणांतच बाळाचे डोके बाहेर आल्याचे दिला जाणवले. तिने कसा-बसा बाथरूमचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक दिली. यानतंर, जॉनस्टन-ग्राइम्स फायर डिस्ट्रिक्टच्या टीमने घटनास्थळी पोहोचून तिची सुरक्षित प्रसूती केली. 

यानंतर बाळाला आणि त्याच्या आईला रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या आई आणि मुलगा दोघेही सुखरूप असून तिने मुलाचे नाव 'ओनिक्स किंग ईस्टरली' ठेवण्यात आले आहे.

एमीथिस्ट आधीच एका मुलाची आई आहेत. पहिल्या वेळेस तिला गर्भधारणेची सर्व सामान्य लक्षणे जाणवली होती. मात्र यावेळी ती तिला जाणवली नाही. तिचे वजन वाढण्याऐवजी कमी होत गेले. "मला केवळ प्रसूतीदरम्यान पाठदुखी सुरू झाली आणि बाळ खाली सरकल्यावरच त्याच्या हालचाली जाणवल्या," असे तिने सांगितले. आपल्या मुलाला तिने गमतीने 'आमचा फेडएक्स बेबी' असेही म्हटले आहे.

खरे तर, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही, तर यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. काही आठवड्यांपूर्वी इलिनॉयमधील मेलानी स्मिथ या २८ वर्षीय महिलेला ख्रिसमसच्या दिवशी अचानकच एका मुलाला जन्म दिला होता.
 

Web Title : आश्चर्य! महिला ने ऑफिस में बच्चे को जन्म दिया, गर्भावस्था से अनजान।

Web Summary : आयोवा में एक महिला ने FedEx में काम करते हुए बच्चे को जन्म दिया, और उसे गर्भावस्था का पता ही नहीं चला। अचानक प्रसव पीड़ा होने पर, उसने पैरामेडिक्स की सहायता से एक स्वस्थ बच्चे को जन्म दिया। माँ और बच्चा दोनों ठीक हैं, जिसका नाम ओनिक्स किंग ईस्टरली रखा गया है। ऐसा ही एक मामला हाल ही में इलिनोइस में सामने आया।

Web Title : Surprise! Woman Delivers Baby at Work, Unaware of Pregnancy.

Web Summary : An Iowa woman gave birth at her FedEx workplace, shockingly unaware of her pregnancy. Experiencing sudden labor pains, she delivered a healthy baby boy with assistance from paramedics. Both mother and child are doing well, named Onyx King Easterly. This isn't an isolated incident, as a similar case occurred in Illinois recently.