शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
6
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
7
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
8
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
9
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
10
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
11
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
13
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
14
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
15
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
16
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
17
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
18
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
19
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
20
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! म्हशीच्या प्रेमासाठी दिला जीव, गळफास घेत दिला जगाला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 15:38 IST

उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे जिथे म्हशींसाठी तरूणीने आत्महत्या केली आहे.

जालौन: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अनोख्या घटना व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात की, ज्यांच्यावर विश्वास ठेवणेही कठीण असते. उत्तर प्रदेशातून एक अशीच विचित्र घटना समोर आली आहे. कारण इथे एका तरूणीने आपल्या म्हशी हरवल्याच्या शुल्लक कारणावरून आपले जीवन संपवले आहे. या मुलीला म्हशींची एवढी सवय झाली होती की, म्हशी घरी न परतल्याने ती व्यथित झाली आणि अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. आपल्या घरातील काही सदस्यांना शोधण्याचा मुलीने खूप प्रयत्न केला. परंतु, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. 

ही घटना उत्तर प्रदेशातील जालौनमधील कुरोना गावात घडली आहे. तेथील रहिवासी बॅनी केवट यांनी एकून ३ म्हशी पाळल्या होत्या. या सर्व म्हशींची देखभाल त्यांची मुलगी रजनी करत होती त्यामुळे तिला त्यांची खूप सवय झाली. या म्हशींची सगळी व्यवस्था रजनी करत असल्यामुळे अचानक तिन्ही म्हशी गायब झाल्याचा तिला धक्का बसला. 

म्हशी हरवल्याने केली आत्महत्या

मृत तरूणी रजनीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जुलै रोजी सर्व म्हशींना नेहमीप्रमाणे चरायला सोडले होते. मात्र, त्या दिवशी म्हशी माघारी परतल्याच नाहीत. अचानक सर्व म्हशी गायब झाल्याने रजनी खूप व्यथित झाली होती. ती सतत विचार करत बसायची आणि २० जुलै रोजी तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच आम्ही तिला औराई येथून झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालय येथे पुढील उपचारांसाठी नेले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश