शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

गावातच युवकांनी रोजगार निर्माण करावा

By admin | Updated: December 27, 2014 00:04 IST

राजेंद्र मुंबरकर : वागदे येथे श्रमसंस्कार शिबिरात मार्गदर्शन

कणकवली : आप्पासाहेब पटवर्धन यांनी जात-पात न मानता सर्वांना एकत्र करून त्यांच्यामध्ये मिळून मिसळून काम केले. त्यामुळे समाजातील जाती-धर्माची दरी कमी होते. आज लोक समाजाकडे पाठ फिरविताना आढळून येतात. युवकांनी शहराचा रस्ता न धरता आपल्याच गावामध्ये रोजगार निर्माण केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. कणकवली कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर गोपुरी आश्रम वागदे येथे संपन्न होत आहे. त्यामध्ये गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी ‘गोपुरीचा वारसा’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यावेळी मुंबरकर बोलत होते. या व्याख्यानाला परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वयंसेवकांना उद्बोधन करताना राजेंद्र मुंबरकर म्हणाले, गोपुरी हे एक माळरान होते. तेथे आप्पासाहेब पटवर्धन यांनी नंदनवन फुलविले. महात्मा गांधींच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी खेड्यामध्ये येऊन समाजाची सेवा केली. त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात स्वच्छता, शौचालय तयार करणे, कातडी कमावणे, अस्पृश्यता निवारण, आदींपासून केली. मेलेली जनावरे ही देशाची संपत्ती आहे, असे त्यांनी पटवून दिले. घराचे शौचालय, गोबर गॅस हे प्रयोग आप्पांनी सुरू केले आणि ते यशस्वी केले. शेती, शेतीपूरक व्यवसाय, गोधन, आदींना त्यांनी प्राधान्य दिले. म्हणून आप्पा त्यांच्या कर्तृत्वाने एक अवलिया ठरले. त्यांनी आपल्या कामाची कधीही प्रसिद्धी केली नाही, असे ते म्हणाले.यावेळी प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. डॉ. खंडेराव कोतवाल, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बाळकृष्ण गावडे, प्रा. बाळासाहेब राठोड, प्रा. सुरेश पाटील, आदी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील १२० स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होत्या. पूजा चव्हाण हिने प्रास्ताविक केले. सृष्टी तावडे हिने आभार मानले. (प्रतिनिधी)गोपुरी आश्रमाद्वारे दिलेल्या प्रशिक्षणातून आज जिल्ह्यामध्ये २५० लहान काजू उद्योग किंवा संस्था आहेत, असे भरीव कार्य गोपुरीचे आहे. आप्पासाहेबांचे विचार व प्रेरणा घेऊन तुम्ही समाजात मिसळण्यासाठी सज्ज व्हा. तुम्ही सर्वजण स्वयंसेवक बुद्धिवान आहात. या बुद्धीला योग्य न्याय द्या, अशा शिबिरांद्वारे सामाजिक बांधीलकीचा वसा घेऊन जा व आपल्या गावामध्ये, शेतीमध्ये प्रयोग करून विविध सामाजिक उपक्रमांना मदत करा.