विश्वविक्रमी भरतनाट्यमला रत्नागिरीचा सलाम

By Admin | Updated: January 13, 2015 00:11 IST2015-01-12T22:52:23+5:302015-01-13T00:11:34+5:30

रत्नागिरीच्या १८ मुलींनी सहभाग घेऊन या विश्वविक्रमाला सलाम केला

World Recording Bharatanatyamam Ratnagiri Salute | विश्वविक्रमी भरतनाट्यमला रत्नागिरीचा सलाम

विश्वविक्रमी भरतनाट्यमला रत्नागिरीचा सलाम

रत्नागिरी : कोल्हापूर येथील शाहू स्टेडियम येथे रावणेश्वर मंदिराशेजारी झालेल्या नृत्यसंस्कार भरतनाट्यम उपक्रमात रत्नागिरीच्या १८ मुलींनी सहभाग घेऊन या विश्वविक्रमाला सलाम केला. रत्नागिरीतील या उगवत्या तारकांनी आपल्या कलेचे सादरीकरण येथे केले.तपस्या सिद्धी कला अकादमी, कोल्हापूरतर्फे संयोगिता पाटील यांनी या विश्वविक्रमाचे आयोजन केले होते. रत्नागिरीच्या साईश्री नृत्य वर्गाच्या संचालिका मिताली भिडे व त्यांच्या शिष्यांचा यामध्ये सहभाग होता. भरतनाट्यम विश्वविक्रमात साईश्री नृत्यवर्गाने रत्नागिरीचे नाव जागतिक पातळीवर पोचवण्याचे काम केले आहे. भरतनाट्यममध्ये प्रथमच विश्वविक्रम होत आहे. यामध्ये भरतनाट्यम नृत्यांगना सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंतरराष्ट्रीय नृत्यांगना जयलक्ष्मी अय्यर व प्रादेशिक अधिकारी अशोक पाटील उपस्थित होते. संध्याकाळी ठीक ७ वाजता गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉडसाठी १२ मिनिटांचा भरतनाट्यम नृत्याविष्कार सादर झाला आणि बरोबर अर्ध्या तासाने गिनीज बुकच्या अधिकारी मिस फॉर्च्युना यांनी हा विश्वविक्रम जाहीर केला. विश्वविक्रम जाहीर होताच आसमंतात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.सर्वांसाठी हा क्षण ‘न भूतो न भविष्यती’ असा होता.या विश्वविक्रमात रत्नागिरीच्या मिताली भिडे, रेणुका पंडित, केतकी गुणे, ऋचा खेडेकर, तन्वी जोग, मानसी सोमण, तन्वी दरडी, अनुष्का सावंत, जाई पटवर्धन, गिरिजा आंबर्डेकर, नेहा जाधव, नेहा आंबर्डेकर, प्रणाली तोडणकर, वैभवी पवार, स्रेहल कळंबटे, आर्या माने, सानिका सरदेशपांडे व प्रांजली पाध्ये या सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: World Recording Bharatanatyamam Ratnagiri Salute