शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहाय्यक वाहताहेत कामाचा भार

By admin | Updated: February 2, 2015 00:06 IST

मागणीकडे दुर्लक्ष : ३६पैकी २९ पदे रिक्त असल्याने एका सहायकाला १५ गावे

मंदार गोयथळे - असगोली -एकीकडे वारंवार बदलणाऱ्या हवामानामुळे शेतकरीवर्गाची कसोटी लागत आहे, तर दुसरीकडे मात्र वातावरणाच्या बदलत्या रंगामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असताना गुहागर तालुका कृषी कार्यालयात थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचणाऱ्या कृषी सहाय्यकाची वानवा असून, गेले कित्येक दिवस हे पद रिक्त आहे. केवळ सात कृषी सहाय्यक गुहागर तालुक्याचा भार वाहात आहेत. यामुळे अधिकच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार कोण? असा प्रश्न निर्माण होत आहे. तालुक्यात १२२ गावांसाठी तालुका कृषी कार्यालयाला एकूण ३६ कृषी सहाय्यकांची मागणी असताना सद्यस्थितीत केवळ ७ कृषी सहाय्यक कार्यरत आहेत. त्यामुळे २९ पदे रिक्त आहेत. या परिस्थितीत सध्या कार्यरत असलेल्या सात कृषी सहाय्यकांमध्ये प्रत्येक कृषी सहाय्यकाला सरासरी १५ गावांच्या कामाचा भार घेऊन काम करावे लागत आहे. उपलब्ध असणाऱ्या कृषी सहाय्यकांमधील काहींना वेळोवेळी प्रशिक्षण अथवा अन्य कामासाठी इतरत्र पाठविले जाते. इतर शासकीय कामाचा भारही त्यांच्यावर सोपवला जातो. त्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.बदलत्या काळात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानानुसार उत्पन्न वाढीसाठी प्रोत्साहीत केले जात असले तरी बदलत्या हवामानाचे संकटही त्याच्यासमोर ठाकल्यामुळे वेळोवेळी त्याला मार्गदर्शनाची गरज भासते. ही पदे तत्काळ भरण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी कधी पूर्ण होणार असा सवाल विचारला जात आहे.