शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा ‘अ’ विजेता

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. --जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले,

आचरा : महाराष्ट्र पोलीस दल दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग पोलीस दलाने आचरा पोलीस ठाणे येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी दल सदस्यांच्या घेण्यात आलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत आचरा सागर सुरक्षा दलाच्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला.विजेत्या संघांना सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते चषक, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मालवण, निवती, विजयदुर्ग, वेंगुर्ला आणि आचरा दलाच्या दोन संघांनी सहभाग दर्शवला होता. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात, मालवण पोलीस निरीक्षक विश्वजीत बुलबुले, वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे रजपूत, देवगड पोलीस निरीक्षक गंभीर, आचरा सरपंच मंगेश टेमकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी विजय खरात यांच्या हस्ते करण्यात आले होते. जिल्हाधिकारी ई. रविंद्रन म्हणाले, देशाच्या सुरक्षेचा विचार करता सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला देश सुरक्षित बनवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने सुरक्षा रक्षक बनणे गरजेचे आहे. यावेळी सागर सुरक्षा रक्षकांच्या कार्याचे कौतुक करताना अधीक्षक बाविस्कर म्हणाले, सागर सुरक्षा रक्षकांचे कार्य महनीय असून अनेक दहशतवादी कारवाया या सुरक्षा रक्षकांमुळे रोखू शकलो. देशाविरोधात होणारे हल्ले रोखता आले. दहशतवादी कारवाई रोखण्यासाठी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून नागरिकांचे सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. यावेळी कथामाला मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, यशराज संघटना, उत्कृष्ट पंच म्हणून काम करणारे सुरेंद्र सकपाळ व सुभाष भाट यांचा जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)