शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मध्यरात्रीपर्यंत जागून पुनर्विसर्जन

By admin | Updated: October 1, 2015 00:28 IST

मांडवी मित्रमंडळाचा उपक्रम : ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेल्या मूर्ती पुन्हा समुद्रात

रत्नागिरी : भरतीमुळे अनंत चतुर्दशीदिवशी समुद्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आल्या. मांडवीतील नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी पोलिसांना कळवले. शहर पोलीस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांनी मांडवीतील तरूणांना गणेशमूर्ती विसर्जन करण्याची विनंती करताच मांडवी मित्र मंडळाच्या तरूणांनी पहाटे ३.३० ते ४ वाजेपर्यंत जागून किनाऱ्यावरील सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन केले.रविवारी (२७) दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत समुद्राला ओहोटी होती. सायंकाळी ७ पासून भरती सुरू झाली. रात्री १२ वाजेपर्यंत भरती असल्यामुळे किनाऱ्यापर्यंत समुद्राचे पाणी आले होते. त्यामुळे भाविकांनी किनाऱ्यालगतच गणपतींचे विसर्जन केले. त्यामध्ये छोट्या शाडूच्या मूर्तींपासून ४ ते ५ फूट प्लॅस्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती होत्या. भरतीवेळी किनाऱ्यापर्यंत आलेले पाणी ओहोटीवेळी ५० फूट पुन्हा खाली जाते. त्यामुळे किनाऱ्यालगत विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती ओहोटीवेळी वाळूत किनाऱ्यालगत सापडल्या. ४ ते ५ फूटी मूर्ती १७ ते १८ तर छोट्या मूर्तींचाही यात समावेश होता. मांडवीतील नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच पोलिसांना कळवण्यात आले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंद्रजीत काटकर यांनी मांडवी किनाऱ्यावर येऊन स्थानिक तरूणांना किनाऱ्यावरील मूर्ती पुन्हा विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्यानुसार सुनील शिवलकर, परिमल मायनाक, रोहन मायनाक, विशाल शिवलकर, अमोल शिवलकर, अभय शिवलकर, सागर पावसकर, स्वप्नील नागवेकर, सूरज बावणे, सिध्देश शिवलकर, उमेश वारंग, रोहीत शिवलकर, अनिकेत पाटील, विशाल कीर, निशीकांत वारंग यांनी मध्यरात्री ३.३० ते ४ वाजेपर्यंत किनाऱ्यावरील सर्व गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन केले.भाविक गणेशमूर्ती विसर्जीत केल्यानंतर घरी जातात. मूर्ती विसर्जीत झाल्या आहेत किंवा नाही याबाबत ते फारसे जागरुक नसतात. मात्र, किनारपट्टीलगत राहणाऱ्या मंडळींना याबाबत दक्ष रहावे लागते. ज्यावेळी अशा प्रकारची बाब लक्षात येते त्यावेळी मात्र त्यांना पुढकार घ्यावा लागतो. मध्यरात्रीपर्यंत काळोखात जागून गणेशमूर्ती विसर्जीत करण्याच्या मांडवी मित्र मंडळातील तरूणांच्या स्तुत्य उपक्रमांचे परिसरातून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)