शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडी, दोडामार्ग येथे आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 00:07 IST

प्रशासन सज्ज : दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त

वैभववाडी, दोडामार्ग : वैभववाडी आणि दोडामार्ग या नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतींसाठी आज, रविवारी मतदान होणार आहे. उद्या, सोमवारी मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकाल अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असून, वैभववाडीत १७ पैकी ४ प्रभाग बिनविरोध झाल्याने १३ प्रभागांत निवडणूक होत आहे, तर दोडामार्गमध्ये १७ प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. वैभववाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, गावविकास आघाडी आणि शिवसेना-भाजपची युती अशी चौरंगी लढत असून, दोडामार्गमध्ये युतीविरुद्ध आघाडी यांच्यात दुरंगी लढत होणार आहे. मात्र, दोडामार्गात या प्रमुख चारही पक्षांसमोर काही प्रभागांत मनसे आणि अपक्षांनी आव्हान निर्माण केले आहे.दोडामार्ग नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी १७ मतदान केंद्रे असून, प्रत्येक केंद्रावर सहा कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे १०२ कर्मचारी आणि २ अधिकारी मिळून १०४ कर्मचारी काम पाहणार आहेत. तसेच २७ जवानांची एसआरपी तुकडी, ११४ पोलिसांच्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सावंतवाडीचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार काम पाहणार आहेत.वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी आज मतदान होत असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पाच मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्याकरिता १०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक बंदोबस्तासाठी शीघ्र कृती दल व राज्य राखीव दलाच्या एकेका तुकडीसह नऊ अधिकारी व सुमारे दोनशे पोलीस तैनात ठेवण्यात आले आहेत. नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी पाच मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. त्यासाठी ११८२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. तहसील कार्यालय प्रभाग २ व ४, भूमी अभिलेख कार्यालय प्रभाग १, दत्त विद्यामंदिरमध्ये प्रभाग ५, ६, ८, ११, १२, १३, वाभवे शाळेमध्ये प्रभाग ९, १०, १४, गावठण अंगणवाडी प्रभाग १७ अशा पाच मतदान केंद्रांवर (पान १० वर)मतदान होणार आहे. याकरिता मतदान केंद्र अध्यक्ष १३, राखीव २, मतदान अधिकारी क्र. २- १३, राखीव २, मतदान अधिकारी क्रमांक २- १३, राखीव २ ,मतदान अधिकारी क्रमांक ३ - १३, राखीव २, असे मिळून ६० अधिकारी तसेच तीन व्यवस्थापक, तीन क्षेत्रीय अधिकारी, पोलीस कर्मचारी १३, शिपाई १३, असे मिळून एकूण ९२ अधिकारी व कर्मचारी नेमले आहेत. याखेरीज निवडणूक निरीक्षक रवींद्र सावळकर, निर्णय अधिकारी संतोष भिसे, सहायक निवडणूक अधिकारी जी. आर. गावित लक्ष ठेवणार आहेत. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. पोलीस उपअधीक्षक पद्मजा चव्हाण वैभववाडीत ठाण मांडून आहेत. या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून एक पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक २, पोलीस उपनिरीक्षक ५, पोलीस कर्मचारी ५०, होमगार्ड ७०, राज्य राखीव दल व शीघ्र कृती दल प्रत्येकी एक तुकडी मिळून एकूण २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दोडामार्गात दोन्ही बाजूंच्या परस्पर तक्रारीदोडामार्ग : दोडामार्ग निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला युती व आघाडी यांच्यातील वादामुळे शनिवारी सायंकाळी येथील वातावरण तणावपूर्ण झाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मतदानाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसमार्फत पैसे वाटण्यासाठी बाहेरील लोक आणल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. काँग्रेसनेही भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचे सांगून भाजपनेच पैसे वाटण्यासाठी बाहेरून माणसे आणल्याचा आरोप केला.हे दोन्ही आरोप-प्रत्यारोप ऐकून घेतल्यानंतर उपविभागीय अधिकारी विठ्ठल चोरगे यांनी दोन्ही बाजूंनाही शांततेचे आवाहन करून, दोषी आढळला तर तत्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या वादावर काही प्रमाणात पडदा पडला. मात्र, पोलिसांनी खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त वाढवीत दोन्ही बाजूंना शांततेचे आवाहन केले. (प्रतिनिधी)