शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा दारू वाहतूक करताना सोलापूर येथील दोघे ताब्यात, बांदा पोलिसांकडून कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 18:34 IST

८ लाखाचा मुद्देमाल जप्त

सावंतवाडी : बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांकडून विलवडे येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवीण महावीर बोराडे (वय ३०, रा. मोडनिंब, पाटोळे वस्ती, बैरागवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), राम नागनाथ माने (३५, रा. मुक्काम पोस्ट आष्टी, ता. मोहोळ, जि. सोलापूर), अशी त्यांची नावे आहेत.त्यांच्याकडून तब्बल ८ लाख ६९ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी पहाटे २:५५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी की, बांदा पोलिसांनी संशयास्पद पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप थांबवून तपासणी केली असता गाडीमध्ये खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा आढळून आला.या दारू साठ्याची किंमत ३ लाख ६९ हजार ६०० रुपये इतकी आहे. दारू वाहतुकीसाठी वापरलेली ५ लाख रुपये किमतीची पिकअप गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. बांदा पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल विठ्ठल खरात यांच्या फिर्यादीवरून बांदा पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राजेश गवस, दादा परब आणि पोलिस कॉन्स्टेबल खरात यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल तेली करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Duo Arrested in Banda for Illegal Liquor Transport

Web Summary : Banda police arrested two Solapur residents, Pravin Borade and Ram Mane, for illegally transporting Goan liquor worth ₹3.69 lakh. The police seized the liquor and the pickup truck used for transport, totaling ₹8.69 lakh. A case has been registered, and further investigation is underway.