शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

वारगांवात भीषण अपघातात दोन ठार; तीन जखमी

By admin | Updated: May 15, 2014 00:26 IST

कणकवली : वारगांव येथे बुधवारी सायंकाळी आयशर टेम्पोने इको स्पोर्ट कारला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले.

कणकवली : वारगांव येथे बुधवारी सायंकाळी आयशर टेम्पोने इको स्पोर्ट कारला दिलेल्या धडकेत दोघे जागीच ठार झाले. तर तिघे गंभीर जखमी झाले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरील वारगांव पिकअपशेडनजीक हा अपघात घडला. कारमधील श्वेता चारूहास आंजुर्लेकर (वय ५६) आणि पूनम मिलन आंजुर्लेकर (वय ५६) या दोन महिला जागीच ठार झाल्या. तर संध्या कोरगांवकर (वय ३५), सुधीर कोरगांवकर (वय ३९) आणि चारूहास आंजुर्लेकर (वय ५७, सर्व रा.गोरेगांव, मुंबई) हे जखमी झाले. हे सर्व मालवण तारकर्ली येथे जात होते. सिद्धी रोडवेजचा आयशर टेम्पो (एम.एच.-०५-ए९८५९) गोव्याहून मुंबईकडे काजू साले घेऊन जात होता. आयशर टेम्पोने वारगांव पिकअप शेडनजीक समोरून चालणार्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. याचवेळी मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या इको स्पोर्ट गाडीला (एम.एच.-०२-डीजे-२९६९) जोरदार धडक बसली. अपघातानंतर घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता. अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा परिषद सदस्य रत्नप्रभा वळंजू, रमाकांत राऊत, वारगांव सरपंच एकनाथ कोकाटे, इरफान मुल्ला, किशोर सावंत, नंदू शिर्सेकर आदींनी धाव घेतली आणि जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. जखमींना कणकवली येथे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चारूहास आंजुर्लेकर यांना कणकवलीत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर संध्या व सुधीर कोरगांवकर यांना गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)