शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारा बकऱ्यांचा अचानक तडफडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 19:36 IST

Kudal sindhudurgnews- तब्बल बारा बकऱ्यांचा तडफडून अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील गोठोस येथे ही घटना  घडली. तीन बकरे आणि नऊ मादी जातीच्या बकऱ्यांचा यात समावेश आहे. या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने धनगर बांधवांना धक्का बसला आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे.

ठळक मुद्देबारा बकऱ्यांचा अचानक तडफडून मृत्यू माणगाव खोऱ्यातील गोठोस येथील घटना : धनगर बांधवांना धक्का

कुडाळ : तब्बल बारा बकऱ्यांचा तडफडून अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील गोठोस येथे ही घटना  घडली. तीन बकरे आणि नऊ मादी जातीच्या बकऱ्यांचा यात समावेश आहे. या घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने धनगर बांधवांना धक्का बसला आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे.याबाबत माहिती अशी की, माणगाव खोऱ्यातील निळेली येथील रहिवासी असलेले पंढरी बाबू येडगे यांच्या मालकीच्या या बकऱ्या आहेत. येडगे यांनी या बकऱ्या नेहमीप्रमाणे चरावयास सोडल्या. लेणीपासून नजीकच असलेल्या गोठोस येथील माळरानावरील बागेजवळ बकऱ्या चरत होत्या. त्यांचे पोट भरल्यावर त्या नजीकच असलेल्या तळीवर पाणी पिण्यासाठी उतरल्या.

पाणी प्यायल्यावर अचानक एक-दोन बकऱ्या तडफडू लागल्या आणि जाग्यावरच लोळण घेत पडल्या. हा प्रकार बघून मालकालाही काही समजले नाही त्याने धावाधाव केली. मात्र, अन्य बकऱ्याही तशा तडफडू लागल्या एक-दोन नव्हे तर बारा बकऱ्या जागीच गतप्राण झाल्याने खळबळ उडाली. मालकाच्या डोळ्यासमोर हा प्रकार झाल्याने गोठोस येथील धनगर बांधवांना धक्काच बसला. त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. पंढरी येडगे यांचे मोठे नुकसान झाले आहे.विषारी औषध प्राशनाने मृत्यू झाल्याचा अंदाजगोठोस परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी आले. याबाबत तत्काळ पशुसंवर्धन विभागालाही कळविण्यात आले. पशु अधिकारी निकम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या परिसरात वन्यप्राण्यांचा त्रास अधिक असल्याने शेती-बागायतीचे नुकसान होते. त्यामुळे त्याचा बंदोबस्त करण्यासाठी विषारी औषध फवारणी केली जाते. त्याचे प्राशन या बकऱ्यानी केले असावे व त्यातच त्यांचा मृत्यू आला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :kudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग