शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका बंद करण्याची वेळ

By admin | Updated: November 10, 2014 23:54 IST

शिवसेनेची आक्रमक भूमिका : मालवण मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब

मालवण : शहरवासीय धूळ आणि खड्ड्यांच्या समस्येने त्रस्त आहेत. राज्यात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले असताना शहरात डास निर्मूलन मोहिम बंद आहे. कचरा व्यवस्थापन, बंद पथदीप, कमी दाबाचा वीजपुरवठा आदी तक्रारी कायम आहेत. मोकाट गुरांचा त्रास पुन्हा सुरु झाला आहे. पण पालिका प्रशासन पूर्णत: ठप्प आहे. पालिकेकडून नागरिकांना सुविधा मिळत नसतील तर पालिकाच बंद करण्याची वेळ आली आहे, असा इशारा मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने देण्यात आला.शहरातील विविध प्रश्नांबाबत सोमवारी शिवसेनेच्यावतीने पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांना जाब विचारण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख बबन शिंदे, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नगरसेवक रविकिरण आपटे, नगरसेविका सेजल परब, शहरप्रमुख नंदू गवंडी, सन्मेश परब, धीरज केळुसकर, जाबीर खान, किसन मांजरेकर, दीपक मयेकर, मेघा गावकर, दीपक गावकर, गणेश कुडाळकर, बाबू मांजरेकर, नंदा सारंग यांच्यासह अन्य शिवसैनिक उपस्थित होते.यावेळी बोलताना तालुकाप्रमुख बबन शिंदे म्हणाले, रडतखडत चाललेल्या भुयारी गटार योजनेमुळे शहरातील व्यापारी व नागरिकांना धुळीच्या समस्येने ग्रासले आहे. सर्वच ठिकाणचे रस्ते खराब झाल्याने नागरिकात असंतोष आहे. पालिका ही समस्या गांभिर्याने घेताना दिसत नाही. नागरिकांना पालिका प्रशासन सुविधा पुरवू शकत नसेल तर घरपट्टी वसुली तरी कशासाठी केली जाते. नागरिकांच्या प्रश्नांबाबत पालिकेने ठोस कार्यवाही हाती घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)समस्यांबाबत पालिका प्रशासन गंभीरभुयारी गटार योजनेचे काम युद्धपातळीवर होण्याबाबत ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील काही रस्त्यांखालील पाण्याची पातळी अजूनही कमी न झाल्याने खोदकामात अडचणी येत आहेत. मागील दीड वर्षात भुयारी गटार योजनेच्या कामात गती आली आहे. मागील चार वर्षांपासून शहरातील रस्त्यांवर डांबरीकरण झालेले नाही. यामुळे रस्ते खराब झाले आहेत हे मान्य आहे. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरु करणार आहेत. ४५ किलोमीटरपैकी ३४ किलोमीटर गटार योजनेचे पाईपलाईन पूर्ण झाली आहे. डास निर्मूलनाबाबत व अन्य समस्यांबाबत पालिका प्रशासन गंभीर आहे.- अरविंद माळी,मुख्याधिकारी, मालवणतक्रार रजिस्टर कशासाठी : आपटेशहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनाला समजण्यासाठी व त्यांची तत्काळ सोडवणूक व्हावी यासाठी पालिकेमध्ये तक्रार रजिस्टर ठेवण्यात आले आहे. या तक्रार रजिस्टरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडे प्रशासनाला वेळ नसल्याचे नगरसेवक रविकिरण आपटे यांनी सांगितले. याठिकाणी तत्काळ तक्रार रजिस्टर उपलब्ध करण्यात यावे अशी मागणीही आपटे यांनी केली. पथदीप व मोकाट जनावरांमुळे जनतेच्या रोषाला नगरसेवकांना सामोरे जावे लागत असल्याचेही ते म्हणाले. खराब रस्ते, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, दिवाबत्ती, डासांचा प्रादुर्भाव, मोकाट जनावरांचा प्रश्न अशा सर्वच बाबतीत मालवण नगरपालिका अपयशी ठरली आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रशासन व कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहोत. मात्र पालिका प्रशासनाने ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. आठ दिवसांत पालिकेने कोणतीही कार्यवाही न केल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा भाई गोवेकर यांनी दिला.