शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

‘सह्याद्री’त होणार ‘टायगर डे’

By admin | Updated: July 28, 2015 21:54 IST

मंगळवारी कार्यक्रम : वन्यजीव विभागाची तयारी पूर्ण

पाटण : ‘वर्ल्ड हेरिटेज’ म्हणून गणल्या जाणाऱ्या कोयना व चांदोली अभयारण्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. वाघांच्या संवर्धनासाठी कोयना हे ठिकाण अत्यंत अनुकूल असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्यातील मेळघाट (ताडोबा), अंधारी (पेंच) प्रमाणे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास महत्त्व आले असून, येत्या ४ आॅगस्ट रोजी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही ‘टायगर डे’ होणार आहे. त्याची तयारी सुरू असल्याचा वन्यजीव विभागाकडून दुजोरा मिळाला आहे.२९ जुलै हा ‘टायगर डे’ म्हणून साजरा केला जातो. पर्यावरण व मानवी साखळीत वाघांना फार महत्त्व आहे. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातही सध्या पाच पट्टेरी वाघ असल्याचे प्राणी गणनेतून सिद्ध झाले आहे. सुरुवातीला सह्याद्रीची निर्मिती झाली तेव्हा कोयना व चांदोलीत वाघ आहे की नाही, याबाबत बरीच चर्चा झाली होती. आता मात्र गत वर्षीपासून वन्यजीवचे अधिकारी व कर्मचारी सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचे ठामपणे सांगत आहेत.वाघांची शिकार करणाऱ्या टोळ्या किंवा स्थानिक तस्कर यांच्यापासून धोका निर्माण होऊ नये म्हणून व्याघ्र गणनेच्या आकडेवारीत गुप्तता बाळगली जाते. कोयना व चांदोली अभयारण्याचा १६०० चौरस किलोमीटरचा जंगलव्याप्त भूभाग असून, त्यामध्ये सह्याद्री टायगर प्रोजेक्ट साकारला आहे. व्याघ्र गणनेनुसार पाच पट्टेरी वाघ, तसेच चार किलोमीटर अंतरागणिक बिबट्याचे वास्तव्य सह्याद्री व्याघ्रमध्ये आहे. सुमारे ५० ते ६० बिबटे सह्याद्री व्याघ्रमध्ये असल्याचा वन्यजीव विभागाचा अंदाज आहे. सांबर, भेकर, ससे आदी तृणभक्षी प्राण्यांसहित गवे, रानडुक्कर, अस्वलांची संख्याही लक्षणीय आहे. राज्यातील इतर टायगर प्रोजेक्टच्या तुलनेत सह्याद्री व्याघ्रची प्रसिद्धी झाली पाहिजे, त्यासाठी ‘टायगर डे’ सारखे उपक्रम राबविण्याचा मानस आहे. (प्रतिनिधी)मॉरिशिस बेटाएवढा सह्याद्री प्रकल्प जगात प्रसिद्ध असलेल्या मॉरिशिस बेटाएवढे क्षेत्रफळ कोयना व चांदोली अभयारण्याचे असून, भविष्यात सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाची तुलना मॉरिशिस बेटाशी होईल. अत्यंत घनदाट अरण्य व डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या सह्याद्री व्याघ्रला कोयना जलाशयाची किनार लाभली आहे.२९ जुलै रोजी ‘टायगर डे’ साजरा होणार होता. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे निधन झाल्यामुळे ४ आॅगस्टला ‘टायगर डे’ साजरा करण्याचा वन्यजीव विभागाचा, राज्य टायगर प्रकल्पांचा विचार आहे. -सुभाष पुराणिक, वनसंरक्षक, कोयना वन्यजीव विभाग