शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 29, 2015 23:53 IST

रात्रीत १२ दुकाने फोडली : जिल्हाभरात चोरट्यांचा वावर ?

रत्नागिरी : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी रत्नागिरी शहरासह जिल्हाभरात गेल्या आठवडाभरात धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील बेकरी, बार, रुग्णालयासह १२ दुकाने चोरट्यांनी रविवारी रात्री फोडल्याचे सोमवारी सकाळी उघडकीस आले. या चोरीमध्ये अल्प रक्कम चोरीस गेली असली तरी दुकाने फोडण्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.चोरट्यांचे मोठे टोळके जिल्ह्यात चोरीच्या उद्देशाने आल्याची माहिती चोरट्यांकडूनच नागरिकांना देण्यात येत असून धमकावले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे अनेक गावांतील ग्रामस्थही सतर्क झाले आहेत. गावात कोणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास अशा लोकांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचे प्रकारही घडले आहेत. रत्नागिरी बाजारपेठेतील शिवकृपा बेकर्स, राज इलेक्ट्रॉनिक्स, उज्वला वॉच, रत्नागिरी गादी कारखाना, जागृती ट्रान्स्पोर्ट, मुकुंद कृपा बार, पांचाळ सायकल मार्ट ही सात दुकाने फोडल्याची तक्रार संबंधित मालकांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या सर्व दुकानांमध्ये मिळून रुपये २४७० रुपयांचे साहित्य व रोख रकमेची चोरी झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. या ७ दुकानांशिवाय आणखी ५ व्यावसायिक दुकाने, रुग्णालय, कार्यालये चोरट्यांनी फोडली. त्यातूनही काही वस्तू व ऐवज लंपास झाला आहे. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन पाहणीही केली; परंतु संबंधितांनी चोरीची तक्रार दिलेली नाही, असे सांगण्यात आले. चोरट्याने मुकुुंद कृपा बारच्या दरवाजाचे कडी कोयंडे तोडले व आत प्रवेश केला. आतील बीअरच्या बाटल्या तसेच कॅश काऊंटरच्या ड्रॉव्हरमधील काही रोख रक्कमही त्याने लंपास केली. या बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने चोरटा या फुटेजमध्ये दिसला आहे. तो वयस्कर असल्याचे स्पष्ट झाले असून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.रत्नागिरीत चोरट्यांचा धुमाकूळरत्नागिरी गादी कारखान्यातही चोरट्यांनी कॅश काऊंटरचा ड्रॉव्हर फोडून आतील चिल्लर व काही रोख रक्कम लंपास केली. मुख्य पोस्ट नाक्यापासून जवळच असलेल्या एका रुग्णालयाच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे स्पष्ट झाले. काही ठिकाणी घडलेल्या घटनांची चर्चा जिल्हाभर होत असतानाच त्यातून नाहक अफवा पसरविण्याचे प्रकारही काहीजणांकडून होत असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी तालुक्यातील एका गावात एका घरात रंगकाम करण्यासाठी आलो आहोत, असे सांगणाऱ्या दोघांना घरच्यांनी घरातच कोंडले व गाव जमा झाला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु ते चोरटे नव्हते तर खरोखरच पेंटर होते, असे समोर आल्याची खुमासदार चर्चाही सुरू आहे. (प्रतिनिधी)भय इथले संपत नाही...लांजा तालुक्यातील पुनस, कुवे व रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी या गावांत गेल्या आठवडाभरापासून रात्रीच्यावेळी घरांच्या दरवाजावर बाहेरून टकटक करणे, घरावर दगड मारणे, घराजवळ विचित्र आवाज काढणे असे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात आले. हरचेरी मलुष्टेवाडी व मुस्लिमवाडी येथे गेल्या आठवडाभरात हे प्रकार सातत्याने घडत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून या गावात ग्रामस्थांनी पहारा ठेवला आहे. हे प्रकार कोण करतेय त्यांचा शोध घेऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ग्रामस्थांनीच मोहीम सुरू केली आहे.