शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस असल्याचा बनाव करणाऱ्यांना अखेर अटक

By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST

सहाजणांचा समावेश : मेर्वीतील डिसेंबर महिन्यातील घटना

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येमधील संशयिताना आश्रय दिल्याने चौकशीसाठी आलो असल्याची बतावणी करीत व पोलीस असल्याचा बहाणा करीत घरात शिरणाऱ्या सहा संशयितांना पूर्णगड सागरी पोलिसांनी अटक केली आहे. तालुक्यातील मेर्वी गावी १४ डिसेंबर २०१४ रोजी हा प्रकार घडला होता.याप्रकरणी ज्या सहाजणांना अटक करण्यात आली आहे, त्यामध्ये सुभाष शिवराम गमरे (४२, रा. परळ), पुंडलिक कृष्णा जाधव (५६, इचलकरंजी), समीर सुभाष खेतले (३०, देवरुख), धर्मराज जयराम म्हामूरकर (५९, जयसिंगपूर, कोल्हापूर), सचिन जयराम कांबळे (३३, देवरुख), सुरेश जगन्नाथ खोत (३८, शाहूवाडी) यांचा समावेश आहे. याशिवाय प्रकाश इंगळेसह तिघेजण अजून फरारी आहेत.१४ डिसेंबर २०१४ रोजी मेर्वी धनगरवाडी येथील ओंकार मनोहर अभ्यंकर यांच्या घरासमोर गाड्या लावून १० ते १५ अज्ञात घरात घुसले. आम्ही पुणे येथील पोलीस असून, दाभोलकर यांच्या हत्येसंदर्भात तपासासाठी आलो आहोत, असे सांगून मनमानी केली होती. तुम्ही दाभोलकर हत्येतील संशयितांना आश्रय दिला, असे अभ्यंकर कुटुंबीयांना सांगितले होते. मात्र, घरच्यांनी या अज्ञातांना झडती वॉरंट आहे का? असे विचारत घराची झडती घेण्यास विरोध केला होता. तरीही या अज्ञातांनी अभ्यंकर यांच्या देवघरापासून सर्व खोल्यांची झडती घेतली आणि सामान अस्ताव्यस्त केले.या लोकांकडून आपल्या जीवितास धोका असल्याचे तक्रारवजा निवेदन ओंकार अभ्यंकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते. पोलिसांनी या संशयितांना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता १०पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. (प्रतिनिधी)