शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 16, 2015 22:59 IST

गुरुनाथ पेडणेकर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती सभेत आदेश

सिंधुदुर्गनगरी : प्राथमिक आरोग्यकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मस्टरवर सही करत नाहीत. बाहेर जाताना हालचाल रजिस्टरवर नोंद करत नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. तरी यापुढे मस्टरवर सह्या व हालचालीबाबत नोंद न करणाऱ्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी आरोग्य समिती सभेत दिले.जिल्हा परिषद आरोग्य समितीची सभा सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सभागृहात पार पडली. यावेळी जान्हवी सावंत, रेश्मा जोशी, प्रमोद कामत, निकिता जाधव, भारती चव्हाण आदी सदस्यांसह खातेप्रमुख, अधिकारी, समिती सचिव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांना भेटी दिल्या असता वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मस्टरवर सही करत नसल्याचे आणि हालचाल रजिस्टरवर नोंद करत नसल्याचे काही ठिकाणी आढळून आले. मात्र, ही बाब गंभीर आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या मुख्यालयी थांबणेही तेवढेच महत्वाचे आहे. तरी यापुढे याचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी दिले. तर आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनीही याबाबत दुजोरा देत आरोग्य सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे हे ओळखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करावे अशा सूचनाही यावेळी केल्या.निरवडे प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या इमारतीचे ५ लाख रुपये निधी खर्चून काम सुरु आहे. मात्र, या कामाबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. संबंधित ठेकेदाराकडून मनमानी सुरु आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप सदस्या निकिता जाधव यांनी आरोग्य समिती सभेत केला. तर या कामाची चौकशी करा व आठ दिवसांत अहवाल सादर करा असे आदेश सभापती पेडणेकर यांनी दिले तर आरोग्य विभागांतर्गत मंजूर कामे व सुरु असलेल्या कामाची माहिती व कामाचे अंदाजपत्रक संबंधित रुग्णकल्याण समितीला देण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनी केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला अधिक चांगली आरोग्यसेवा देता यावी. आरोग्य यंत्रणेत सुसूत्रता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने योजना तयार केल्या जात आहेत. त्यामध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्रे सुविधायुक्त बनविण्यासाठी कायापालट योजना, जन्मजात आई मृत्यू पावलेल्या मुलांना आधार देण्यासाठी ‘सिंधु बालक योजना’ अशा विविध नाविन्यपूर्ण योजना प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पंढरपूरला वारी करणाऱ्या वारकरी मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यावर्षीपासून पंढरपूर वारकऱ्यांसाठी सिंधुदुर्ग ते पंढरपूर अशी विशेष आरोग्य सेवा दिली जाईल. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व पुरेसा औषध साठा असलेले पथक दिले जाईल अशीही माहिती यावेळी दिली. ओसरगांव व वैभववाडी येथे डेंग्यूच्या डासाची अळी सापडली आहेत. तेथील बांधकामावरील कामगारांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. याबाबत पहाणी करून तेथे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत अशी माहिती देतानाच जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया अशा साथरोगावर आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोणत्याही साथरोगाची लागण होऊन रुग्ण दगावता कामा नये याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले आहेत तर आवश्यक औषधसाठा उपलब्ध करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)जिल्ह्यात २६0 पाणी नमुने दूषितसिंधुदुर्ग जिल्ह्यात जून अखेर घेतलेल्या ११३५ पाणी नमुन्यामध्ये २६० एवढे पाणी नमुने दूषित आढळल्याची माहिती देतानाच या कालावधीत पाणी शुद्धीकरणावर भर दिला जात आहे. पाण्यापासून उद्भवणारे आजार पसरू नयेत याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे.