शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

चोरटे सरसावले; पोलीस हतबल

By admin | Updated: July 2, 2015 00:27 IST

तपासाचे आव्हान : स्थानिकांच्या समावेशाची शक्यता, राग काढण्याचा प्रकार

मिलिंद पारकर - कणकवली -शहरातील घरफोड्यांमागील रॉनी गॅँगला जेरबंद केल्यानंतरही शहरातील घरफोड्यांचे सत्र थांबता थांबेना. एकामागोमाग एक होणाऱ्या घरफोड्यांनी कणकवलीवासीयांसह पोलिसांना हैराण करून सोडले आहे. अपुऱ्या मनुष्यबळासह काम करणाऱ्या पोलीस यंत्रणेला तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. शहरातील घरफोड्यांची पद्धत पाहता स्थानिकांच्या समावेशाची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्याबरोबरच अकरा ठिकाणी फ्लॅट फोडून ऐवज चोरीस न जाणे आणि संगणक फोडणे आणि स्टील डीश वाकवून राग काढण्याने पोलीस चक्रावले आहेत. लांगींच्या बदलीने प्रश्नचिन्हशहरातील घरफोड्यांचा यशस्वी तपास करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी यांची मालवण येथे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी अद्याप कोणी नवीन अधिकारी आलेला नाही. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच असून या घरफोड्यांचा तपास होऊन चोरटे जेरबंद होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, सावंतवाडी पाठोपाठ चोरट्यांनी कणकवलीला टार्गेट केल्याचे दिसत आहे.दोन महिन्यांतील पाचवी घटनागेल्या दोन महिन्यांतील शहर परिसरातील ही घरफोडीची पाचवी घटना आहे. २७ मे रोजी जानवली येथे बंगला फोडून ५० हजार रोकड लांबविण्यात आली होती. ३१ मे रोजी साईनगर येथील बंगला, १३ जून रोजी महाजनी नगरात पाच बंगले फोडण्यात आले होते. मात्र, या घरफोडीतून ऐवज चोरीस गेलेला नाही. कुठल्याही वस्तूंना हात लावला नाही४मंगळवारी रात्री दीड नंतर या घरफोड्या करण्यात आल्या. एकूण अकरा ठिकाणी चोरीचा प्रयत्न करताना चोरट्यांनी फक्त रोकड आणि सोन्याचा शोध घेतल्याचे दिसते. इतर वस्तूंना हात लावलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.चोरट्यांनी राग काढला४कामत सृष्टीतील दुर्गा कन्स्ट्रक्शनचे कार्यालय फोडून आतील कपाटे विस्कटून चोरट्यांना काहीच हाती लागले नाही. कार्यालयातील संगणकाचा मॉनिटर बाहेर जमिनीवर आपटून फोडण्यात आला. ४बांधकरवाडीतील मनोहर नार्वेकर यांच्या घरातील स्टीलची डीशही वाकवून टाकण्यात आली होती. अकरा ठिकाणी प्रयत्न करूनही काही न मिळाल्याने कदाचित चोरट्यांनी राग काढला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. ४बांधकरवाडीतील मनोहर नार्वेकर यांच्या बंद घराबाहेर पोलिसांना देशी दारूची बाटली आढळून आली आहे. घरफोड्या करणाऱ्यांपैकी कोणीतरी ती तेथे टाकली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ४चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये किमान तीन ते चार जणांचा समावेश असावा, असा पोलिसांचा कयास आहे. संकुलांमधील फ्लॅटमध्ये अद्यापही सुरक्षेचे कोणतेही उपाय नसल्याचे दिसून आले.