शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प

By admin | Updated: June 3, 2015 01:25 IST

दीपक केसरकर : २० कोटी खर्च अपेक्षित

वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातपीक शेतकऱ्यांकरिता २० कोटी खर्चाचा कुडाळ एमआयडीसी येथे अत्याधुनिक भात गिरणी प्रकल्प येत्या एक वर्षात कार्यान्वित होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अर्थ व ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली.वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात ग्रामीण कृषी विकास आणि कृषी पर्यटन चर्चासत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी केसरकर यांनी संवाद साधला. व्हिलेज टुरिझम अंतर्गत तेरेखोल-आरोंदा खाडी, कर्ली कालावल, विजयदुर्ग खाडी यामध्ये वॉटर टुरिझम राबविले जाणार असून, यातून स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. परुळे गावाला भारतातील पहिला स्वच्छ गाव म्हणून पुरस्कार मिळाल्याने या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास साधला जाणार आहे. याचबरोबर आरोंदा, कवठणी, तोंडवळी, हडी, मसुरे, विजयदुर्ग, रामेश्वर-गिर्ये, पडेल येथेही पर्यटन प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सुमारे ९ कोटी व्हिलेज टुरिझम विकास करण्याकरिता कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे या चारही जिल्ह्यांत पर्यटन प्रकल्प हाती घेतले जाणार आहे.इंडो इस्राईल प्रकल्पांतर्गत रोजगार हमी योजना दुसरा टप्पा या कार्यक्रमांतर्गत कृषी खाते व फळ संशोधन केंद्र यांच्या माध्यमातून आंबा पिकाला उद्भवणारे फळ गळ, डाग या प्रादुर्भावावर उपाययोजना करण्याकरिता केंद्राच्या माध्यमातून प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. त्याकरिता वेंगुर्लेत प्रायोगिक तत्त्वावर आंबा झाडांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)वेंगुर्लेत अत्याधुनिक रुग्णालय वेंगुर्ले येथे आरोग्याचा प्रश्न सोडविण्याकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या मोकळ्या जागेत ५० कॉटचे सुमारे ७ कोटी ५१ लाख खर्चाचे अत्याधुनिक रुग्णालय त्याचबरोबर डायलेसिस सेंटर आणि ग्रामीण रुग्णालयाच्या सध्याच्या जुन्या इमारतीत चायनिज रिसर्च सेंटर उभारून त्याला डॉ. द्वारकानाथ कोटणीस असे नामकरण करण्याचा प्रस्ताव आहे. याचबरोबर वेंगुर्लेत मच्छिमारांकरिता व्हिलेज टुरिझम अंतर्गत नवाबाग खाडी येथे सुमारे २ कोटी ३१ लाख खर्चाचे झुलते पूल उभारले जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.