शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण सुरू

By सुधीर राणे | Updated: February 13, 2024 16:28 IST

कणकवली : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने ११ ऑगस्ट २०२३ रोजी एसटी प्रशासनाला बेमुदत उपोषणाबाबत नोटीस देण्यात आली होती. त्या ...

कणकवली : महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्यावतीने ११ ऑगस्ट २०२३ रोजी एसटी प्रशासनाला बेमुदत उपोषणाबाबत नोटीस देण्यात आली होती. त्या अनुषंगाने शासन पातळीवर  संघटनेच्या पदाधिका-यांसमवेत झालेल्या बैठकीत प्रलंबित आर्थिक मागण्यांवर निर्णय झालेले होते. परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे आज, मंगळवारपासून  कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ संघटनेच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दिलीप साटम,विभागीय अध्यक्ष सुरेंद्र  मोरजकर, विभागीय सचिव विनय राणे, विभागीय खजिनदार अनिल नरदत्ता मराठे, शिवाजी कासले, कैतान फर्नांडिस, संजय सावंत,अविनाश सावंत,नंदकुमार घाडी, अविनाश दळवी, संतोष ठूकरुल, दाजी भाट, अमिता राणे, ममता तावडे, शैलजा कासले, रेखा वरुटे आदी उपस्थित होते.११ ऑगस्ट २०२३ रोजी संघटनेसोबत प्रशासनाची बैठक झाली. त्यावेळी महागाई भत्ता, घरभाडे भत्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केलेले होते. परंतु ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप अशी बैठक झालेली नाही. त्याचप्रमाणे अप्पर मुख्य सचिव (वित्त), प्रधान सचिव (परिवहन) व उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ यांची समिती अन्य आर्थिक मागण्यांवर निर्णय घेणार होती. यामध्ये सन २०१६-२०२० च्या कामगार करारासाठी शासन, प्रशासनाने एकतर्फी जाहिर केलेल्या रुपये ४८४९ कोटीमधील शिल्लक रक्कमेचे वाटप, रुपये५,०००, ४००० व २५०० मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवाजेष्ठ कर्मचा-यांच्या वेतनात झालेल्या विसंगती दूर करून सरसकट रूपये ५००० द्यावेत. राज्य परिवहन कामगारांना ७ वा वेतन आयोग लागू करणे व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून संबधित समितीने आपला अहवाल शासनास ६० दिवसात सादर करण्याचे मान्य केलेले होते. परंतु ६० दिवसांऐवजी ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर केलेला नाही. या सर्व प्रलंबित आर्थिक मागण्यांच्या सोडवणूकीसाठी संघटनेने १३ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषण सुरू करण्याची उपोषण नोटीस राज्य परिवहन प्रशासनास १ जानेवारी २०२४ रोजी दिलेली आहे. या उपोषण नोटीसची दखल घेऊन उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी १३ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी संघटनेसमवेत बैठक घेऊन संबधित आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला जाईल असे मान्य केले होते. मात्र , त्रिसदस्यीय समितीची प्राथमिक बैठक झालेली असूनही वरील सर्व आर्थिक प्रलंबित मागण्यांची सोडवणूक न झाल्याने संघटनेने १३ फेब्रुवारी २०२४ पासून राज्यातील सर्व विभागीय पातळीवर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयाजवळ मंगळवारी उपोषणाला प्रारंभ करण्यात आला. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीST Strikeएसटी संप