शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. दरीत कोसळून नऊ जखमी

By admin | Updated: February 23, 2016 00:48 IST

खारेपाटण येथील घटना : कंटेनर चालकाने हुलकावणी दिल्याने अपघात

खारेपाटण : मुंबई-विजयदुर्ग एस. टी. बस (एमएच २०-२१३६)ला खारेपाटण येथील टाकेवाडी- कुंभारदेव मंदिरानजीक गोसावीवाडी फाटा येथे समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस सुमारे १५ फूट खोल दरीत कोसळली. यात चालक व वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर सोमवारी पहाटे ५.२५ च्या दरम्यान झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे, मुंबईवरून विजयदुर्गला येणारी प्रवासी एसटी बसचे चालक श्रीनाथ एकनाथ पडेलकर (रा. तिर्लोट आंबेरी, विजयदुर्ग) व वाहक गणेश कीर हे प्रवाशांना घेऊन येत होते. खारेपाटण-टाकेवाडी येथे एका अवघड वळणावर ही बस आल्यानंतर समोरून येणाऱ्या कंटेनरचालकाने हुलकावणी दिल्यामुळे बस चालकाचा बसवरील ताबा सुटून एसटी बस सुमारे १५ फूट दरीत कोसळली. साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना क्षणात काय झाले कळेना. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये वासुदेव गोविंद पावसकर (वय ५८, चिपळूण), चंद्रकांत अनंत पडेलकर (५०, रा. पडेल), नाऊ बाळू मठकर (६७, रा. नाटळ), एकनाथ विठ्ठल पुजारी (५२, रा. पुरळ), नारायण शंकर चव्हाण (७७, रा. मुटाट), पूर्णिमा चंद्रकांत पडेलकर (रा. पडेल), प्रभावती मण्यार (रा. नडगिवे), चालक श्रीनाथ पडेलकर, वाहक गणेश कीर हे जखमी झाले असून, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांकरिता कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सर्व जखमी प्रवाशांना पाठविण्यात आले आहे. (वार्ताहर) खारेपाटण ग्रामस्थांची धाव अपघाताचे वृत्त खारेपाटणमध्ये समजताच तेथील ग्रामस्थांनी धाव घेतली व जखमींना तत्काळ बाहेर काढले. यामध्ये भाऊ राणे, बबन तेली, सचिन शिंदे, गणेश घेवडे, राजू वरुणकर, डॉ. बोडके, मनोज गुरव, महेश पाटील, बाबा शेट्ये, अण्णा तेली, आदींनी मदतकार्य केले. पारिजात टॅ्रव्हल्सकडून मदत पारिजात ट्रॅव्हल्सने मुंबईवरून कणकवलीच्या दिशेने जाणारी आपली बस थांबवून जखमी प्रवाशांना एस. टी.मधून बाहेर काढण्यास मदत केली. ट्रॅव्हल्सच्या बसचालकाने स्वत: खोल दरीत उतरून प्रवाशांना बाहेर काढले. तसेच आपल्या गाडीतील शिडीचा वापर जखमींना मदत करण्यासाठी केला. एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी मुंबई-विजयदुर्ग बसच्या अपघाताचे वृत्त समजताच एसटीचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले. नुकसान तसेच अपघाताविषयी पाहणी केली. तसेच घटनास्थळी पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.