शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: January 12, 2015 21:47 IST

रणजीत देसाई : सिंधुदुर्गनगरीत दूध उत्पादक संस्थांची बैठक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरू झाले असून त्याचे चांगले चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. मात्र, तरीही जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून त्या गोकुळ आणि जिल्हा परिषद लक्ष घालून सोडवेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी सिंधुदुर्गनगरी येथील दुग्ध उत्पादक संस्थांच्या बैठकीत दिली.जिल्हा परिषद भवनातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात दुग्ध उत्पादक सहकारी संस्थांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी व या संस्थांना बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने या बैठकीचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी ‘गोकुळ’चे व्यवस्थापक डॉ. मोजक, जिल्हा परिषद सदस्य सतीश सावंत, जिल्हा बँकेच्या संचालिका नीता राणे, सुगंधा साटम, संग्राम प्रभूगावकर, गोकुळचे तानाजी डोगळे, संस्था अध्यक्ष, सचिव, आदी उपस्थित होते.जिल्ह्यात दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी गोकुळबरोबरच जिल्हा परिषदही आपल्या योजना प्रभावीपणे राबवील, अशी ग्वाही रणजीत देसाई यांनी दिली. गोकुळचे नियम, निकष आणि योजनाही कोल्हापूर आणि अन्य भागांप्रमाणे सिंधुदुर्गसाठीही तशाच आहेत. यातून शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर ते प्रश्न सोडविण्यात येतील, असेही गोकुळचे व्यवस्थापक डॉ. मोगल यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू : सावंतशेतकऱ्यांनी दुग्ध उत्पादन वाढविताना त्याच्या दर्जाकडेही लक्ष द्यावे. दर्जा टिकविण्यास त्याला चांगला दरही मिळेल. जर दर्जा असतानाही दर मिळाला नाही, संकलनामध्ये दुधाची तूट आली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर हे प्रश्न गोकुळमार्फत सोडविले जातील, असेही सतीश सावंत यांनी सांगितले.