शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या आरोपीला बेळगावात अटक अत्याचार प्रकरण

By admin | Updated: August 21, 2014 00:28 IST

पाचजणांना सात दिवसांची कोठडी

सिंधुदुर्गनगरी : सावंतवाडी येथे युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी पाच आरोपींना काल, मंगळवारी अटक करण्यात आले होते, तर फरार असलेला सहावा आरोपी सुफियान शेख याला आज पहाटे बेळगाव येथून ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या सहा संशयित आरोपींपैकी पाच आरोपींना २६ आॅगस्टपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे, तर अल्पवयीन असलेल्या स्वरूप आरेकर याला बालसुधारगृहात पाठविण्याचा निर्णय दिला. सावंतवाडी येथे एका युवतीवर अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी अमित महादेव मोर्ये, आदित्य सुदन्वा आरेकर, मंगेश नीळकंठ सावंत, नंदकिशोर बाळकृष्ण गावडे, स्वरूप हेमंत आरेकर, सुफियान महबूब शेख यांना आज, बुधवारी ओरोस येथील न्यायालयात उभे केले असता विशेष न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी सहा संशयित आरोपींपैकी पाचजणांना पोलीस कोठडी, तर यातील अल्पवयीन असलेल्या स्वरूप आरेकर याला बालसुधारगृहात ठेवण्याचा निर्णय दिला. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. अमोल सामंत यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)