शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणीआठ जणांना अटक

By admin | Updated: October 31, 2014 23:36 IST

कोकण मर्कंटाईल : नकली दागिन्यांवर घेतले कर्ज

देवरुख : नकली दागिन्यांवर कर्ज घेऊन तब्बल ३९ जणांच्या टोळक्याने कोकण मर्र्कं टाईल बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी ४ आॅक्टोबर रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होता. या खळबळजनक घटनेच्या तपासाला आता वेग आला असून, शुक्रवारी सायंकाळी यातील आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील आणखी आरोपींची माहिती पोलिसांकडून घेतला जात आहे. आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या ९ पर्यंत पोहोचली आहे. यापूर्वी आस्मा शौखत शेख कसबा (कसबा शास्त्रीपूल) या महिलेला अटक करण्यात आली होती. दरम्यानच्या चार दिवसानंतर शुक्रवारी यात आठ जणांना संगमेश्वर पोलिसांनी अटक करुन देवरुख न्यायालयात हजर केले. या आठ जणांमध्ये सुचित्रा चंद्रशेखर महाडिक (रा. कसबा राववाडी), रईसा अब्बास नायकोडी, हाफिजा मजिद नायकोडी (दोन्ही रा. कसबा शास्त्रीपूल), रजिया गुलाम निलानी कुरेशी (रा. माखजन), सोहनलाल गेसूलाल प्रजापती (रा. बाजारपेठ, संगमेश्वर) तसेच नसिमा अब्दुल्ला नाईक (कसबा शास्त्रीपूल), जाहिदा नाझिर आंबेडकर (रा. आंबेड बु.) आणि फहीम अब्दुल्ला नाईक (रा. कसबा) यांचा समावेश आहे. यांनी ११ मे २०१२ ते १९ सप्टेंबर २०१४ या कालावधीत बनावट दागिने गहाण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींनादेखील लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. फिर्याद कोकण मर्र्कं टाईल बँकेचे मुंबईचे व्यवस्थापक अकबर युसूफ कोंडकरी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली होती. या प्रकरणामध्ये ३९ जणांच्या टोळक्याने बँकेची २ कोटी ८२ लाख ७७ हजार ६४९ रुपयांची फसवणूक केली होती. त्याचा तपास चालू आहे. या बॅँकेत अनेकांनी नकली दागिने देऊन त्यावर कर्ज घेतल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हाभरात खळबळ माजली होती. बनावट सोनेतारण प्रकरणामध्ये आज आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले हे करीत आहेत. दरम्यान, आज उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांनी भेट दिली. (प्रतिनिधी)