शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

बायोडिझेलसाठी शेवाळी शेतीची संधी

By admin | Updated: February 2, 2015 00:05 IST

राजापूर किनारपट्टी ठरू शकते फायदेशीर : चौगुले

राजापूर : सन २०३०पर्यंत बायोडिझेलचे उत्पादन ३० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट जगासमोर असल्यामुळे या बायोडिझेलसाठी लागणारी समुद्री शेवाळाची शेती भविष्यात राजापूर तालुक्याच्या किनारपट्टीवर चांगलीच बहरेल, असा विश्वास पुणे येथील भारती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. बी. बी. चौगुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे. कोकण किनारपट्टीवरील वातावरण या समुद्री शेवाळाच्या शेतीसाठी पोषक असून, भविष्यात ही किनारपट्टी जगाला इंधन पुरविणारी ठरु शकते, असेही मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे. राजापूर तालुक्याच्या किनारपट्टी भागात खारलँडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. समुद्राची पातळी वाढत चालल्यामुळे या भागातील शेतीच्या जमिनी नापीक होण्याचा धोका वाढला आहे. समुद्राचे खारे पाणी शेतजमिनीत घुसू लागल्यामुळे खारलँडचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे. आगामी काळात पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी बायोडिझेल हा एकमेव पर्याय जगासमोर आहे. जगाची वाढती लोकसंख्या पाहता सन २०२०पर्यंत अन्नधान्याची कमी भरुन काढण्यासाठी सुमारे १९ टक्के अधिक जमीन लागवडीखाली आणण्याचे जागतिक उद्दिष्ट असल्याचेही डॉ. चौगुले यांनी सांगितले. प्रारंभी पूर्ण विद्यापीठामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. बी. बी. चौगुले यांनी राजापूर तालुक्यातील अणसुरे, मिठगवाणे, जानशी, केळशी या गावांना भेट दिली. येथील शेवाळांच्या विविध जातीचा अभ्यास करण्यासाठी आपले संशोधन सुरू केले आहे. खारलॅडचे जास्त प्रमाण असणाऱ्या या गावांना भेटी दिल्यानंतर ते लोकमतशी बोलत होते. आज या भागात मोठ्या प्रमाणात कोळंबी शेती केली जात असली तरी ‘व्हाईट व्हायरस’ या रोगामुळे हे कोळंबी प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जागतिक पातळीवर व्हाईट व्हायरस हा मत्स्यशेतीशी निगडीत असणारा रोग सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. आपण या संपूर्ण भागाची पाहणी केली असून, येथील उपलब्ध शेवळाच्या जाती जमा केल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. राजापूर तालुक्यातील समुद्र किनारे फारच स्वच्छ असून, येथील वातावरणही खूपच चांगले आहे. त्यामुळे भविष्यात हा भाग बायोडिझेलसाठी जगाचे लक्ष ठरणारा असू शकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आज ‘व्हाईट व्हायरस’मुळे बंद पडत असलेले कोळंबी प्रकल्पाचे प्लॉट भविष्यात चांगल्या प्रकारे शेवाळ शेतीसाठी उपयोगी ठरु शकतात. शिवाय एक हेक्टर खारलॅड जमिनीमध्ये घेतल्या जाणाऱ्या शेवाळामधून सुमारे तीस हजार लीटर बायोडिझेल मिळू शकते. त्यामुळे भविष्यात या भागातील जनतेसाठी चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. बायोडिझेल हे मोगली एरंडापासूनही मिळविले जाते. मात्र, अन्नधान्याच्या उपलब्धतेसाठी तो पर्याय परवडणारा नाही. त्यामुळे जागतिक पातळीवर खाऱ्या पाण्याची उपलब्धता जास्त असल्यामुळे समुद्री शेवाळ हा एकमेव पर्याय बायोडिझेलसाठी उरला आहे. त्यामुळे राजापूरची किनारपट्टीची गावे बायोडिझेलची गावे ठरु शकतील व या भागाची प्रगती झपाट्याने होत जाईल, असे डॉ. चौगुले यांनी लोकमतला सांगितले. त्यातच शेवाळ हे वातावरणातील कार्बन मोठ्या प्रमाणात शोषून घेत असल्यामुळे ते पर्यावरण रक्षकही आहे. त्यामुळे समुद्री शेवाळाच्या शेतीमुळे कोणत्याही प्रकारची पर्यावरणाची हानी होणार नाही. उलट या भागात उपलब्ध असलेले खारलँडचे क्षेत्र पाहता या भागात अ‍ॅक्वाकल्चर, बायोडिझेल व खाडी भागात समुद्रीशेवाळाची लागवड असे उद्योग चांगल्या प्रकारे उपलब्ध होऊ शकतात, असेही चौगुले यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)