शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

मृत मगर सापडल्याने खळबळ, तेरेखोल नदीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:40 IST

मडुरा-मोरकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी महाकाय मगर मृतावस्थेत कुजलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आली होती. शनिवारी पुन्हा महाकाय मगर मृतावस्थेत त्याच स्थितीत आढळून आली. या दोन्ही मगरी मृत दिसून आल्याने मडुरा परिसरात भीतीने एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देमृत मगर सापडल्याने खळबळ, तेरेखोल नदीतील घटनाचार दिवसांतील दुसरा प्रकार; झटापटीत दोन्ही मगरींचा मृत्यू

बांदा : मडुरा-मोरकेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी महाकाय मगर मृतावस्थेत कुजलेल्या स्थितीत तरंगताना आढळून आली होती. शनिवारी पुन्हा महाकाय मगर मृतावस्थेत त्याच स्थितीत आढळून आली. या दोन्ही मगरी मृत दिसून आल्याने मडुरा परिसरात भीतीने एकच खळबळ उडाली आहे.

मगरींच्या तोंडाकडील भागाचा प्राण्याकडून लचका काढल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. दोन्ही मृत मगरींच्या जबड्याला जखमा असल्याने झटापटीत दोन्ही मगरींचा मृत्यू झाल्याचा संशय मडुरा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल साळगावकर यांनी व्यक्त केला आहे.तेरेखोल नदीतील महाकाय मगरी पाण्याच्या प्रवाहाबरोबर मडुरा नदीत मोठ्या प्रमाणत आल्या आहेत.  याची माहिती वनविभागास देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक महाकाय मगर मृतावस्थेत आढळली होती. त्यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पंचनामा करण्याचे सोपस्कार पूर्ण केले. मृत मगरीची माहिती मिळताच आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक आप्पासो राठोड, डॉ. साळगावकर, सावंतवाडी वनविभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉ. साळगावकर यांनी दोन्ही मगरींचे विच्छेदन केले. दोन्ही मृत मगरींच्या जबड्याला जखमा झाल्या होत्या. झटापटीत जबड्यांचा चावा घेतल्याने धारदार दातांच्या खोलवर जखमा झाल्या होत्या. त्यामुळेच दोन्ही मगरींचा मृत्यू हा झटपटीतून झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.वनविभागाला घटनेचे गांभीर्य नाहीनदीच्या परिसरात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दुर्गंधी येत असल्याचे त्यांनी सर्वत्र पाहणी केली. त्यावेळी मगर कुजलेल्या अवस्थेत दिसून आली. ती मगर दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाल्याचे सांगण्यात येते. वनविभागास सकाळी याची कल्पना देऊनही दुपारपर्यंत कोणताही अधिकारी घटनास्थळी न आल्याने याचे गांभीर्यच नसल्याचे स्पष्ट झाले.

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग