शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
5
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
6
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
7
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
8
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
9
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
10
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
11
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
12
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
13
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
14
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
15
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
16
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
17
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
18
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
19
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
20
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सासोलीत रस्ताच गेला चोरीला

By admin | Updated: February 24, 2015 00:02 IST

दोडामार्ग तालुक्यात खळबळ : नसलेल्या रस्त्याचा केला मूल्यमापन अहवाल

दोडामार्ग : पैसे, मौल्यवान वस्तू, दागदागिने चोरीस जाण्याच्या घटना आतापर्यंत अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र, जिल्हा परिषदेचा रस्ता चोरीस जाण्याची घटना कधी ऐकिवात नाही. परंतु असा प्रकार घडला आहे. दोडामार्ग तालुक्यातील सासोली गावात सासोली मुख्य रस्ता ते वाघमळा या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण न करताच परस्पर काम केल्याची रक्कम अदा करण्याचा प्रकार याठिकाणी घडल्याचे उघडकीस आले आहे. आणि मुख्य म्हणजे रस्त्याचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्याच जिल्हा परिषदेच्या शाखा अभियंत्यांनी रस्ताच जाग्यावर नसताना रस्त्याचे मूल्यमापन करून तसा अहवाल ग्रामपंचायतीला दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली असून, हे प्रकरण चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. सासोली मुख्य रस्ता ते वाघमळा या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व दुरुस्तीचे काम मंजूर झाले होते. मात्र, प्रत्यक्षात काम झाले नसताना काम झाल्याचे दाखवून आणि जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता राजन पाटील यांनी रस्ताच अस्तित्वात नसताना त्याचे मूल्यांकन करण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत ग्रामपंचायत उपसरपंच दीपिका ठाकूर व इतर चार सदस्यांनी दोडामार्ग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, सभापती महेश गवस यांना निवेदन देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी सभापती महेश गवस, उपसभापती आनंद रेडकर, गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण आदींनी ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. यावेळी सरपंच गुरुदास गांजील, ग्रामसेविका एस. पी. जगताप, ग्रामपंचायत सदस्य गिरीश डिचोेलकर, अनिल परब, अनिरुध्द फाटक आदी उपस्थित होते. या चौकशीत सन २०१५ मध्ये हे काम मंजूर झाल्याचे आढळले. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारचे काम झाले नसताना परस्पर बिलापोटी ८०,०००१ चा धनादेश देण्यात आल्याचे आढळले. याबाबत खुलासा करताना सरपंच गुरुदास गांजील यांनी जिल्हा परिषद बांधकामचे शाखा अभियंता राजन पाटील यांनी रस्त्याचे १ लाख ४५ हजार रुपयांचे मूल्यांकन केल्याचा अहवाल दिला. त्यानुसार ग्रामपंचायतीकडून ग्रामसेविका एस. पी. जगताप यांनी धनादेश काढल्याचे सांगितले. मात्र, ग्रामपंचायत सदस्य अनिल परब यांनी ग्रामपंचायत सदस्यांनी बिल अदा करण्यास विरोध केला असताना बिल का काढले, असा सवाल उपस्थित केला. यावेळी ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीचे प्रोसेडिंग तपासण्यात आले असता, त्यात रिकामी जागा सोडण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी सभापती महेश गवस यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)लाचखोरीचा आरोपसासोली ग्रामपंचायतीचे सरपंच गुरुदास गांजील यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजन पाटील हे लाचखोर असल्याचा आरोप केला. प्रत्यक्षात काम नसताना रस्त्याचे मूल्यमापन कसे काय आणि कोणत्या आधारावर करण्यात आले, असाप प्रश्न त्यांनी उपस्थित केला.