शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात मुसळधार !

By admin | Updated: October 26, 2014 00:08 IST

भातशेतीचे नुकसान : पावशीत दोन घरे पडून सव्वा लाखाची हानी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात काल, शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कुडाळ-पावशी येथील दोन घरांची पडझड होऊन सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले, तर कापणीला आलेल्या भातशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात कापणीला जोर आला असून, काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांनी भातशेतीची कापणी करून वाळत ठेवलेले भात वाहून गेले, तर कापणीला आलेली भातशेती जमीनदोस्त झाली आहे. वाफ्यामध्ये पाणी साचून राहिल्याने भातशेती कुजण्याची दाट शक्यता आहे.गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २७.०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे., तर आतापर्यंत एकूण सरासरी २९९२.०५ मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे. गतवर्षीची सरासरी पावसाने गाठली नसली तरी पावसाबरोबरच वादळी वारा येत असल्याने घरांचे व भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने सुरुवात केली. या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील पावशी येथील सुमित्रा भिकाजी कदम यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून घराचे सुमारे ७८ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले, तर पावशी ढवणवाडी येथील उत्तम रामचंद्र चव्हाण यांचे वादळी वाऱ्यामुळे घराचे छप्पर कोसळल्याने सुमारे २३ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद झाली आहे, तसेच अन्य ठिकाणी घरांची, गोठ्यांची पडझड होऊन नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याबाबतची उशिरापर्यंत नोंद झालेली नाही. जिल्ह्यात भात कापणीला जोर आला आहे. मात्र, भरदुपारी पावसाचे आगमन होत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडत आहे. भात कापणीचे कामही लांबणीवर पडले आहे. शुक्रवारी सायंकाळी सुरू झालेला पाऊस रात्रभर कोसळत होता. जिल्ह्यात ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारासिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या ४८ तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात तालुकानिहाय पडलेला पाऊस.आतापर्यंत पडलेला एकूण सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे - दोडामार्ग १५ (३५८४), सावंतवाडी ४८ (३४५९), वेंगुर्ला ४४.६० (२५२०.४०), कुडाळ १९ (३२८३), मालवण ४१ (२७५४), कणकवली २९ (३१००), देवगड १५ (२२७६), वैभववाडी ६ (२९६०) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.