शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीच्या वाट्याला ७९ कोटी ५३ लाख

By admin | Updated: June 7, 2015 00:51 IST

नुकसानभरपाई जाहीर : हेक्टरी २५ हजार; ३३ कोटी ८१ लाखांचा पहिला हप्ता

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंबा-काजू पिकाची नुकसानभरपाई म्हणून जाहीर झालेल्या रकमेतून ७९ कोटी ५३ लाख ६५ हजार २५० रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्याच्या वाट्याला येणार आहे. त्यापैकी ३३ कोटी ८१ लाख रुपये निधीचा पहिला हप्ता जिल्ह्याला प्राप्त झाला आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांप्रमाणे नुकसानभरपाईचे वितरण करण्यात येणार आहे. फेब्रुवारी व मार्चमध्ये सतत दोन ते तीन दिवस झालेल्या पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, २० हजार ७१८.२० हेक्टर क्षेत्रावर पावसामुळे परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम असून, ११ हजार ९६.४१ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाल्याने पीक धोक्यात आले. थ्रिप्सच्या प्रादुर्भावामुळे २०१२ मध्ये झालेल्या आंबा पिकाच्या नुकसानासाठी भरपाई देण्यात आली होती. उर्वरित ३० कोटींचा निधी परत गेला होता. वास्तविक यावर्षी अवकाळीचा फटका सातत्याने आंबा पिकाला बसला. पीक उत्पादन अत्यल्प असतानाही दर टिकणे अपेक्षित होते. आंब्याचे दर गडगडल्यामुळे शेतकऱ्यांनी आंबा पिकासाठी गुंतवलेली रक्कमदेखील वसूल झाली नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांनी शासनाकडे कर्जमाफीची मागणी केली होती, परंतु या मागणीकडे डोळेझाक करीत अल्प नुकसानभरपाई जाहीर केली आहे. (प्रतिनिधी)