शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजन तेलींची राजकीय हद्दपारी निश्चित : राणे

By admin | Updated: September 15, 2014 23:21 IST

सावंतवाडीतील आघाडीचा उमेदवार लवकरच जाहीर

सावंतवाडी : कोकणात अपक्ष उमेदवार चालत नाही आणि मतदार त्यांना स्वीकारत नाहीत हा इतिहास आहे, असे सांगत आम्ही आघाडीच्याच उमेदवाराचा प्रचार करू. सावंतवाडीत अपक्ष म्हणून बढाया मारणारे महिन्यानंतर राजकीयदृष्ट्या तडीपार होतील, असा टोला माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता उद्योगमंत्री नारायण राणे यांनी लगावला. राज्यात पंचरगी लढत होईल, असे मला वाटत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी मांडले.उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज, सोमवारी सावंतवाडीच्या राजवाड्याला भेट देत राजमाता सत्वशीलादेवी भोसलेंचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत नीलम राणे, नूतन सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळा गावडे, संजू परब, वसंत केसरकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, आदी उपस्थित होते.यावेळी उद्योगमंत्री राणे म्हणाले, काँॅग्रेसची यादी येत्या १७ सप्टेंबरपर्यंत जाहीर होईल. पहिल्या यादीत सिंधुदुर्गमधील नावे असतील का, हे मी आजच सांगू शकत नाही. राज्यात दोन्ही आघाड्यांत वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पंचरगी लढत होईल, असे तुम्हाला वाटते का, असे विचारले असता राणे यांनी स्पष्ट शब्दांत नाही असे सांगितले. आघाडीतील तिढा दोन दिवसांत सुटू शकेल, असे ही त्यांनी सांगितले. मी आता दिल्लीलाच चाललो असून तेथे हा निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सावंतवाडी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला असून, तो राष्ट्रवादीलाच मिळेल आणि उमेदवारी ही निष्ठावंत उमेदवाराला मिळेल, याचे संकेत त्यांनी दिले. मीच या मतदारसंघाचा उमेदवार ठरविणार असून, मला उमेदवार ठरविण्याचे जे अधिकार दिले आहेत. ते राष्ट्रवादीचा मोठेपणा असल्याचेही त्यांनी सांगितले. हा मतदारसंघातच नव्हे, तर पूर्ण कोकणात अपक्ष उमेदवार चालत नाही. हा इतिहास आहे. आमचे कार्यकर्ते अपक्षाला कधीही साथ देणार नाहीत. राजन तेली जरी अपक्ष राहिले, तरी त्यांच्यासोबत काँग्रेसचे दोन टक्केकार्यकर्तेही जाणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच एका महिन्यानंतर हे उमेदवार तडीपार असतील, असा टोला ही त्यांनी यावेळी तेलींना हाणला.मी प्रचारप्रमुख असल्याने संपूर्ण राज्यात फिरणार असून, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली येथे प्रचार सभा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)साळगावकरच उमेदवारसावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे जर आघाडीचे उमेदवार असतील, तर ते मला चालतील. मी त्यांना सर्व ती मदत करेन आणि निवडून आणेन, असे सांगत उद्योगमंत्री राणे यांनी साळगावकर यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखविला. तसेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडल्याचेही त्यांनी जाहीर केले.