शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

बांधकाम कल्याणकारी संघाचे प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 6:12 PM

kudal Sindhudurgnews- सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाला कायमस्वरूपी कामगार अधिकारी मिळावा तसेच शासन दरबारी जे न्याय्य प्रश्न आहेत त्यासाठी येत्या शुक्रवारी २६ फेब्रुवारीला तातडीचा कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांनी दिली.

ठळक मुद्देबांधकाम कल्याणकारी संघाचे प्रश्‍न शासन दरबारी प्रलंबितकामगारांचा २६ ला तातडीचा मेळावा : बाबल नांदोस्कर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाला कायमस्वरूपी कामगार अधिकारी मिळावा तसेच शासन दरबारी जे न्याय्य प्रश्न आहेत त्यासाठी येत्या शुक्रवारी २६ फेब्रुवारीला तातडीचा कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बांधकाम कामगार कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम कल्याणकारी संघाचे अनेक प्रश्‍न शासनदरबारी प्रलंबित असल्यामुळे बांधकाम कामगारांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने मंगळवारी कार्यकारिणी सदस्यांची नियोजनाची बैठक जिल्हाध्यक्ष बाबल नांदोस्कर यांच्या अध्यक्षेखाली श्री रवळनाथ मंदिराच्या सभागृह येथे पार पडली.यावेळी काशिराम वाईरकर, दीपक गावडे, एकनाथ सावंत, राजाराम मातोंडकर, शशिकांत कदम, अशोक बोवलेकर, विनायक मेस्त्री, प्रज्ञा सावंत तुळशीदास पवार, निकिता गावकर, सचिन नेरुरकर, संतोष चव्हाण, महादेव वरावडेकर आदी उपस्थित होते.नांदोस्कर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २१ हजार बांधकाम कामगार आहेत पण त्यांचे गेले कित्येक वर्षांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात महत्वाचे प्रश्न मार्गी लागले होते. गेले काही महिने कोरोना महामारी संकटामुळे कामगार कल्याणकारी कर्मचाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.बांधकाम कल्याणकारी संघाचा संबंधित अधिकारी हा प्रभारी असल्यामुळे अनेक प्रश्न हे शासन दरबारी पडून आहेत. कामगार अधिकारी कुबल हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या जागी प्रभारी म्हणून रायगडचे कोल्हटकर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आले आहे. मात्र कोल्हटकर हे महिन्यातून दोन दिवस जिल्ह्यात येत असल्यामुळे आम्हा सर्व बांधकाम कामगारांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत.कामगारांच्या नोंदणीबाबत ऑनलाईन सिस्टीम असल्यामुळे या सिस्टिममुळे प्रत्येकाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कायमस्वरूपी बांधकाम कामगार कल्याण अधिकारी मिळावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधण्यात येणार आहे.प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनवेळप्रसंगी न्याय्य मागण्यासाठी प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्यास बांधकाम कामगारांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही. गेल्या दहा अकरा महिने कोरोना महामारी संकट असल्यामुळे आम्हा सर्व कामगाराना आर्थिक संकटातून वाटचाल करावी लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २६ फेब्रुवारीला कोरोना नियमांच्या अधीन राहून रवळनाथ मंदिर नजीकच्या सभागृहात बांधकाम कामगार कल्याणकारी संघ पदाधिकारी व कामगार यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात बांधकाम कामगार याबाबत पुढील निर्णय घेणार आहेत. यावेळी प्रश्न न सुटल्यास त्याच वेळी आंदोलनाच्या पावित्र्यात आम्ही असणार असल्याचे यावेळी नांदोस्कर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :kudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग