शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

संवादातून जनतेच्या समस्या सोडविणार

By admin | Updated: November 19, 2014 23:19 IST

नीतेश राणे : कणकवली मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेट कार्यक्रम

कणकवली : प्रत्येक गावाचा विकास करीत असताना संवाद महत्वाचा आहे. जनतेचा विश्वास दृढ केला जात असतानाच संवादाच्या माध्यमातून समस्याही तत्काळ सोडविण्यात येतील. आमदार आणि जनता असा भेद न करता एकाच कुटुंबातील आपण सदस्य आहोत या भावनेतून गावाबरोबरच तालुक्याच्या विकासासाठी कार्यरत होऊया, असे आवाहन कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी केले. आमदार नीतेश राणे यांनी कणकवली विधानसभा मतदारसंघातील तीन तालुक्यात गावभेटीचा कार्यक्रम सुरु केला आहे. बुधवारी खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील तळेरे, साळिस्ते, शिडवणे, वारगाव, कुरंगवणे, शेर्पे या गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यापुढे ग्रामस्थांनी कोणत्याही समस्या आपल्यासमोर मांडाव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.या गावभेट कार्यक्रमाच्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद सदस्या रत्नप्रभा वळंजू, बाळा जठार, काँग्रेस विभागीय अध्यक्ष रमाकांत राऊत, पंचायत समिती सदस्य भिकाजी कर्ले, सोनाली शिर्सेकर उपस्थित होते.आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, मतदानाच्या माध्यमातून तुम्ही मला आशीर्वाद दिला आहे. तुमच्या गावाच्या विकासाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. ती निश्चितपणे पार पाडण्यात येईल. पहिल्या टप्प्यात कोणती विकासकामे पूर्ण करून हवी आहेत ते मला सांगावे. त्याप्रमाणे अग्रक्रम देऊन विकासकामे पूर्ण केली जातील. संवादाच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडतानाच प्रलंबित असलेल्या कामांची आठवण करून दिल्यास आम्हाला काम करणे सोपे जाईल. एक दुसऱ्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची आपण काळजी घेऊया. या भागाचा आमदार म्हणून तुमचा माझ्यावर हक्क आहे. त्या हक्कानेच तुम्ही कोणतेही विकासकाम सांगितल्यास ते तत्काळ पूर्ण करण्यात येईल.(वार्ताहर)खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातील गावभेटीदरम्यान आमदार नीतेश राणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.