शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: November 1, 2015 00:06 IST

दोडामार्ग नगरपंचायत निवडणूक : १0४ कर्मचाऱ्यांसह ११४ पोलिसांचा फौजफाटा

दोडामार्ग : कसई-दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीत १७ नगरसेवकांसाठी ४८ उमेदवार रिंगणात उतरले असून रविवारी (दि. १) होणाऱ्या मतदानासाठी सर्व १७ प्रभागांसाठी १७ मतदान केंद्रे निर्माण केली आहेत. मतदान प्रक्रियेसाठी दोन अधिकाऱ्यांसह १०४ कर्मचारी मतदान केंद्र्रावर नियुक्त करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. २७ जवानांची एसआरपी तुकडी, ११४ पोलिसांच्या फौजफाट्यासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी आतापर्यंत उमेदवारांसह मुख्य कार्यकर्त्यांनी जी शांतता व संयम दाखवला तसाच मतदानालाही राखावा, असे आवाहन विठ्ठल इनामदार यांनी केले आहे. कसई-दोडामार्ग नगरपंचायतीसाठी पहिलीच निवडणूक होत आहे. गेल्या तीन वे चार आठवड्यामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार रणधुमाळी उडाली होती. आरोप प्रत्यारोपांच्या फैरींनी राजकीय कलगीतुरा येथे चांगलाच रंगलेला सर्वांनी अनुभवला. विविध नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या खैरातीने मतदारही क्षणभर चलबिचल झाल्याचे चित्र दिसून आले. पण राजकीय मंडळीनी याचा चांगलाच फायदा उठवत आपली बाजू कशी सकारात्मक व योग्य असल्याचे प्रकर्षाने मांडताना कसलाही कसूर सोडला नाही. शुक्रवारी सायंकाळी प्रत्यक्ष प्रचाराची सांगता झाली. मतदारांना वळविण्यासाठी शुक्रवारची रात्र व शनिवारची रात्र उमेदवारांच्या खिसा गार करणारी ठरली. पैसा जाऊदे पण विजय पदरी पडू देत यासाठी उमेदवारांनीही आपला हात ढिला सोडला. मतदानाच्या पूर्वसंध्येला याची सर्व शहराने अनुभूती घेतली. दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला प्रशासन प्रमुख निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणारे विठ्ठल इनामदार यांनी निवडणुकीत आता पर्यंतच्या शांततेत सर्वांचे सहकार्य राहीले आहे. तशीच शांतता मतदानादिवशी व निकाला दिवशीही कायम ठेवावी. उमेदवारांसह संबंधित कार्यकर्त्यांनी उत्साहाला आवर घालत सर्वसामान्यांसाठी व आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी अविरत प्रयत्न करा पण कायद्याच्या चौकटीत राहूनच करा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी) चोख पोलीस बंदोबस्त कंदील रात्रीतील अर्थपूर्ण प्रचाराला आळा बसवा या उद्देशाने शुक्रवारी सायंकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुण्याहून एक एसआरपी तुकडीही मागवून घेण्यात आली आहे. या व्यक्तीरिक्त एक पोलीस उपविभागीय अधिकारी, एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, ४८ होमगार्ड, ४ वायरेलसेट वाहने, ८ वॉकीटॉकी व ५४ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.