शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन अर्ज करणाऱ्यांनाच पक्के परवान

By admin | Updated: December 2, 2014 00:28 IST

किरण बिडकर : १ डिसेंबरपासून अंमलबजावणी सुरूे

सिंधुदुर्गनगरी : शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) प्रमाणेच आता पक्क्या लायसन्सच्या चाचणीसाठी आॅनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली असून उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकणार आहेत. या योजनेमुळे कामात गतिमानता येणार असून अर्जदारांना कोणत्याही माध्यमांची गरज भासणार नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी दिली.
पक्क्या लायसन्ससाठी नागरिकांना आरटीओ कार्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागत होती. नागरिकांना कार्यालयात उपस्थित राहून तासनतास उभे रहावे लागत असे. आता शासनाने लर्निंग लायसन्सप्रमाणे पक्क्या लायसन्सधारकांना आॅनलाईन अपॉइन्टमेंट सक्तीची करण्यात आली आहे. ही सेवा १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. उमेदवार आपल्या वेळेनुसार लायसन्स चाचणीकरिता दिवस निवडू शकणार आहेत. त्यामुळे संबंधितांना कार्यालयात येऊन तासनतास उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
आॅनलाईन अपॉइन्टमेंट घेताना उमेदवारांनी खालील गोष्टीची खातरजमा करणे आवश्यक-
आॅनलाईन अपॉइन्टमेंट ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर जाऊन ‘इशू आॅफ ड्रायव्हिंग लायसन्स टू मी’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यावर डिएल या पर्यायावर क्लिक करून अर्जातील माहिती भरावी.
अर्जदाराने वेब अ‍ॅप्लीकेशन नंबर लक्षात ठेवून संकेतस्थळावर जाऊन त्यामधील ‘आॅनलाईन ट्रॅन्झॅक्शन विथ सारथीमधील अपॉइन्टमेंट फॉर स्लॉट बुकींग’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर ‘स्लॉट बुकींग’ या मेनूवर जाऊन त्यामधील डिएल टेस्ट फॉर आॅनलाईन अ‍ॅप्लीकेशनवर क्लिक करावे.
उमेदवारांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेच्या आधी ३० मिनिटे उपस्थित राहून आवश्यक असलेले शुल्क भरावे. तसेच आरटीओ कार्यालयामध्ये १ डिसेंबरपासून पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी अपॉइन्टमेंट न घेतलेल्या उमेदवारांचे पक्क्या अनुज्ञप्तीसाठीचे थेट अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही बिडकर यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)


आरसीबुकसाठी स्मार्टकार्ड नाही
वाहन नोंदणीसाठी तसेच वाहनाच्या इतर कामासाठी (वाहनांचे हस्तांतरण, बँक कर्ज बोजा नोंद, रद्द, दुय्यम प्रत आदी) आॅप्टीकल स्मार्टकार्डचे वितरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे सर्व कामासाठी प्रिप्रिंटेड आरसी दिले जाणार. स्मार्टकार्ड पुरवठा करणाऱ्या कंपनीशी असलेला करार संपल्याने व अद्याप नवीन करार झालेला नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्टकार्डसाठी स्विकारण्यात येणारे ३९४ रूपये संबंधितांना द्यावे लागणार नाहीत.
- किरण बिडकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी