शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू, वागदे ग्रामस्थांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:19 IST

मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा, डॉक्टराना धरले धारेवर

कणकवली : रक्तातील प्लेटलेट्स कमी होऊनही कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट न करता केवळ गोळ्या, औषधे देऊन घरी पाठवलेल्या राजेंद्र बळीराम गावडे (वय ५३, रा. वागदे, डनगळवाडी ) यांचा घरी गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांच्या प्लेटलेट्स  कमी झालेल्या असतानाही त्यांना एडमिट का करून घेतले नाही ? असा सवाल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरले. राजेंद्र गावडे यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होत नाही व नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयातील वातावरण तणावपुर्ण बनले होते.राजेंद्र गावडे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते गुरूवारी सायंकाळी उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आले होते. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उद्या रक्त तपासणी करण्यासाठी या असे सांगितले. परत रुग्णालयात आले असता त्यांना काही चाचण्या करायला सांगितल्या. यात रक्तातील प्लेटलेट्सची संख्या ३६००० एवढी आढळली. त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. तरीही केवळ गोळ्या लिहून देऊन येथील डॉक्टरांनी राजेंद्र यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, घरी गेलेल्या राजेंद्र यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे कुटुंबियांनी त्यांना पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती समजताच वागदे गावातील ग्रामस्थांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. राजेंद्र यांना ऍडमिट करून न घेणारे ते डॉक्टर कोण होते? असा सवाल ग्रामस्थांनी केला. तसेच जोपर्यंत जिल्हा शल्य चिकित्सक येथे येत नाहीत व संबंधित डॉक्टरवर कारवाई तसेच कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला. घटनेचे गांभीर्य ओळखून कणकवली पोलिसही उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याबरोबर ग्रामस्थांची चर्चा सुरु आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Patient Dies Allegedly Due to Doctor Negligence in Kankavali Hospital

Web Summary : Villagers allege negligence at Kankavali hospital led to a patient's death after he was discharged with low platelets. Outraged, they demand action against the doctor and compensation for the family, refusing to claim the body.