शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
3
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
4
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
5
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
6
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
7
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
8
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
9
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
10
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
11
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
12
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
13
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
14
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
15
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
16
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
17
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
18
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
19
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
Daily Top 2Weekly Top 5

Anganewadi Jatra 2026: आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रेत ‘प्लास्टिक’ला नो-एन्ट्री; नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:48 IST

जिल्हा परिषदेचा ‘स्वच्छ यात्रोत्सव’ संकल्प 

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याच्या मोहिमेचा भाग म्हणून यंदाचे प्रसिद्ध यात्रोत्सव ‘पर्यावरणपूरक’ पद्धतीने साजरे करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. दि. ९ फेब्रुवारी रोजी होणारा आंगणेवाडी यात्रोत्सव आणि दि. १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणारा कुणकेश्वर यात्रोत्सव यावेळी पूर्णपणे ‘सिंगल युज प्लास्टिकमुक्त’ असणार आहे. लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणारा कचरा रोखण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक नियमावली तयार केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी यात्रोत्सव काळात स्वच्छतेचे नियोजन करण्यासाठी मालवण आणि देवगडच्या गटविकास अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. यात्रेतील स्टॉलधारकांकडून ‘स्वच्छता कर’ आणि ‘स्वच्छता डिपॉझिट’ आकारले जाणार आहे. जर व्यापाऱ्यांनी आपल्या परिसरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले, तरच ही डिपॉझिट रक्कम परत केली जाईल. अन्यथा, सिंगल युज प्लास्टिक आढळल्यास थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जैविक कचऱ्यासाठी कंपोस्ट खड्डे यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणात जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तात्पुरते कंपोस्ट खड्डे तयार करण्यात येणार आहेत. हॉटेल व्यावसायिकांना निळ्या व हिरव्या कचरा पिशव्यांचे वाटप केले जाईल. मंदिर परिसरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार असून सोशल मीडिया आणि बॅनरद्वारे भाविकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

प्रशासनाचे ‘क्लीन’ नियोजन

दंडात्मक अस्त्र: प्लास्टिक बंदी अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक वस्तू आढळल्यास थेट दंड.
कचरा वर्गीकरण: ओला आणि सुका कचरा गोळा करण्यासाठी स्टॉलधारकांना विशेष पिशव्यांचे वाटप.
स्वच्छता डिपॉझिट: व्यापाऱ्यांनी कचरा व्यवस्थापन केल्यास डिपॉझिट परत मिळणार.
देखरेख: पंचायत समितीच्या माध्यमातून भरारी पथकांचे लक्ष राहणार.

भाविकांसाठी ‘ग्रीन’ प्रोटोकॉल

कापडी पिशव्या: भाविकांनी घरूनच कापडी पिशव्या सोबत आणण्याचे आवाहन.
पर्यायी वस्तू: प्लास्टिक ग्लासेस आणि थर्माकोल ताटांऐवजी कागदी किंवा पत्रावळीचा वापर.
सहभाग: शाळा, मंदिर आणि समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा सक्रिय सहभाग.
आवाहन: ‘प्लास्टिकमुक्त यात्रोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे प्रशासनाचे विनंती.

English
हिंदी सारांश
Web Title : No Plastic at Anganewadi, Kunkeshwar Yatra; Fines for Violators

Web Summary : Sindhudurg district bans single-use plastic at Anganewadi and Kunkeshwar Yatras. Strict rules, fines for violations, and cleanliness deposits for vendors are in place. Compost pits, waste segregation, and public awareness campaigns are planned to ensure a plastic-free festival. Visitors are encouraged to use cloth bags.