शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांकडे देवरूख नगरपंचायतीचे दुर्लक्ष

By admin | Updated: January 10, 2015 00:22 IST

अविनाश शिंदे : आत्मदहन करण्याचा इशारा

देवरूख : शहरातील मच्छी मार्केट येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अविनाश शिंदे यांनी वारंवार करूनसुध्दा प्रशासन त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रजासत्ताकदिनी नगरपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन अविनाश शिंदे यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस ठाणे व नगरपंचायतीला दिले आहे. नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात मच्छी मार्केट याठिकाणी मूलभूत सुविधांतर्गत ग्रामपंचायत अस्तित्त्वात असताना ३० लाख रूपये खर्च करून गाळे उभे करण्यात आले. हे गाळे अनधिकृतपणे उभारले जात असून, ते पाडण्यात यावेत, अशी सक्त सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली होती. या सूचनांची अवहेलना करत ग्रामपंचायतीने हे बांधकाम पूर्ण करून गाळे ग्राहकांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकषानुसार हे गाळे आजही अनधिकृत आहेत. या गाळ्यांवर कारवाई करून त्वरित पाडण्यात यावेत, अशी मागणी एक वर्षापासून शिंदे यांनी उचलून धरली आहे. नगरपंचायत ते जिल्हाधिकारी अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तहसील कार्यालय तेथून सार्वजनिक बांधकाम या कार्यालयाकडून पुन्हा तहसील कार्यालय तेथून नगरपंचायतीला या गाळ्यांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. असे असतानाही कारवाईची कोणतीच हालचाल दिसून येत नाही. उलट हे गाळे व्यापारासाठी सुरूच ठेवण्यात आले आहेत. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून हातोडा फिरवला जातो. हेच कार्यालय स्वत:च्या अनधिकृत बांधकामाबाबत उदासीन दिसून येत आहे, असा आरोप शिंदे यांनी केला आहे. हेच आदेश केवळ कारवाई न झाल्याने कागदोपत्री राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. २४ जानेवारीपूर्वी या बांधकामावर कारवाई न झाल्यास २६ रोजी आत्मदहन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)